Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक शुक्रवारपासून, कुठे आणि कसे पाहता येणार?

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक शुक्रवारपासून, कुठे आणि कसे पाहता येणार?

टोकियो ऑलिम्पिक शुक्रवारपासून, कुठे आणि कसे पाहता येणार?

जगातील सर्वात मोठी आणि मानाची क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिकला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यंदा टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार असून शनिवारपासून मुख्य स्पर्धांना सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. यंदा मात्र २३ जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होईल. ऑलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये धाडले आहे. या पथकात १२० खेळाडूंचा समावेश असून ते विविध अशा ८५ क्रीडा प्रकारांत खेळणार आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये यंदाच्या ऑलिम्पिकबाबत खूप उत्सुकता आहे आहे. भारतामध्ये या स्पर्धा विविध चॅनलवर पाहण्याची संधी मिळणार आहे.

– यंदाचे ऑलिम्पिक २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत टोकियो येथे पार पडणार आहे.

– भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) आणि सोनी लिव्ह अ‍ॅपवर (SonyLIV) टोकियो ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ऑलिम्पिक चार भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क व्यतिरिक्त, दूरदर्शनवरही टोकियो ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. परंतु, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सर्व देशांचे सामने दाखवण्यात येणार असून दूरदर्शनवर केवळ भारतीय खेळाडूंचे सामने आणि भारतीय खेळाडूंनी भाग घेतलेल्या स्पर्धाच दाखवण्यात येतील.

– टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार या सोहळ्याला साधारण दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे.

First Published on: July 22, 2021 11:07 PM
Exit mobile version