Tokyo Paralympics: नोएडाच्या सुहास यथिराजने बॅटमिंटनमध्ये पटकावले सिल्वर मेडल

Tokyo Paralympics: नोएडाच्या सुहास यथिराजने बॅटमिंटनमध्ये  पटकावले सिल्वर मेडल

Tokyo Paralympics: नोएडाच्या सुहास यथिराजने बॅटमिंटनमध्ये पटकावले सिल्वर मेडल

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ( Tokyo Paralympics)  भारताच्या (India) खात्यात आणखी एका पदकाची भर पडली. बॅडमिंटन (badminton)  स्पर्धेत नोएडाच्या सुहास यथिराजने (Suhas Yathiraj )सिल्वर मेडल पटकावले आहे. (Suhas Yathiraj wins silver medal in badminton)  सुहासकडून गोल्डन मेडल हुकले असले तरी भारताच्या खात्यात सिल्वर मेडलची भर पडली आहे. रविवारी टोकीयो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकल एसएल ४ क्लास बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या लुकास मजूरला (Lucas Mazur ) हरवून सुहासने सिल्वर मेडल आपल्या खात्यात जमा केले. नोएडाचा IAS अधिकारी असलेल्या ३८ वर्षीय सुहासने गोल्ड मेडल जिंकण्यासाठी फ्रान्सच्या लुकास मजूरसोबत तगडी फाइट केली. ही स्पर्धा पाहणे रोमांचक ठरले. लुकास मजूरला २१-१५, १७-२१ आणि १५-२१ ने हार मानावी लागली आणि सुहासने सिल्वर पदकावर आपले नाव कोरले.

सुहासला अ गटात क्वालिफायमध्ये लुकास मजूरने हरवले होते. युरोपमध्ये झालेल्या अंजिक्यपद स्पर्धेत लुकासने तीन गोल्ड मेडल मिळवली होती. नोएडाचा IAS सुहास यथिराज हा पॅरालिम्पिकमध्ये विजेते पद मिळवणारा पहिला IAS अधिकारी ठरला आहे.

भारताचा सुहास यथिराज आणि फ्रान्सचा लुकास माजूक यांच्या गोल्ड मेडलसाठी चुरशीची लढाई सुरू होती. ३ फेऱ्यांनंतर ही मॅच संपुष्टात आली. सुरुवातील लुकास गोल्ड मेडल जिंकेल असे वाटत होते. त्याने यापूर्वी देखील टोकीयो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजला पराभूत केले होते. या फायनल स्पर्धेत देखील लुकासला सुहासचा परभूत करण्याची संधी होती मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही भारताच्या सुहासने सिल्वर मेडलवर आपली मोहर उमटवली.

सुहास यथिराजच्या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत सुहासला शुभेच्छा दिल्या आहेत.

 


हेही वाचा – Tokyo Paralympic : बॅटमिंटनपटू प्रमोद भगतची सुवर्ण कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथं सुवर्ण

First Published on: September 5, 2021 9:18 AM
Exit mobile version