IND vs ENG : आम्ही केवळ ‘या’ कारणाने सामना जिंकला म्हणणे चुकीचे – विराट कोहली

IND vs ENG : आम्ही केवळ ‘या’ कारणाने सामना जिंकला म्हणणे चुकीचे – विराट कोहली

विराट कोहली

चेपॉक येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने परिपूर्ण खेळ केला. त्यामुळेच इंग्लंडवर मोठा विजय मिळवण्यात यश आले, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर व्यक्त केले. या सामन्यात पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळत होती. त्यामुळे फलंदाजांना धावा करणे अवघड झाले होते. या खेळपट्टीवर टीकाही झाली. मात्र, भारताचे खेळाडू या आव्हानात्मक परिस्थितीत ज्याप्रकारे खेळले, त्याचे कर्णधार कोहलीने कौतुक केले. भारताने संघाने नाणेफेक जिंकल्यामुळे हा सामना जिंकल्याचे काही लोक म्हणत आहेत. परंतु, आमचा विजय केवळ या कारणाने झाला असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही कोहली म्हणाला.

परिस्थितीनुसार खेळणे गरजेचे

या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणे आणि प्रथम फलंदाजी करणे महत्वाचे होते, असे म्हटले गेले. मात्र, मी या मताशी सहमत नाही. आम्ही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावातही उत्कृष्ट फलंदाजी केली. आम्ही या डावातही जवळपास ३०० धावा केल्या. या खेळपट्टीवरही आम्ही धावा करू शकतो, असा आमच्या फलंदाजांना विश्वास होता. त्यामुळे केवळ नाणेफेक जिंकल्याने आम्ही हा सामना जिंकला असे म्हणणे चुकीचे ठरेल. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असो किंवा वेगवान गोलंदाजांना, तुम्ही परिस्थितीनुसार खेळणे गरजेचे असते, असे कोहली म्हणाला.

प्रेक्षकांचा पाठिंबा महत्वाचा 

तसेच त्याने चेन्नईत सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांचेही आभार मानले. पहिल्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी नव्हती. आम्हाला रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय नसल्याने तो सामना खेळताना थोडे वेगळे वाटले. या सामन्यात आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आमच्या खेळात खूप फरक पडल्याचे कोहलीने सांगितले.

First Published on: February 16, 2021 9:55 PM
Exit mobile version