Uefa Champions League : बार्सिलोनाची इंटर मिलानवर मात

Uefa Champions League : बार्सिलोनाची इंटर मिलानवर मात

बार्सिलोना विजयी

स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीविना खेळणाऱ्या बार्सिलोनाने यूएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात इंटर मिलानवर २-० अशी मात केली. त्यामुळे बार्सिलोनाने ग्रुप ‘बी’ मध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. बार्सिलोनाने या वर्षीच्या स्पर्धेत ३ पैकी ३ सामने जिंकले आहे.

असा झाला सामना

या सामन्यात बार्सिलोनाने आक्रमक तर इंटर मिलानने सावध सुरूवात केली. मेस्सीविना खेळणाऱ्या बार्सिलोनाला सुरुवातीला गोल करायच्या काही संधी मिळाल्या. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. पण त्यांनी आपले आक्रमण कायम ठेवले. याचा फायदा त्यांना ३२ व्या मिनिटाला झाला. त्यांचा मिडफिल्डर राफिनाने गोल करत बार्सिलोनाला १-० ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंत ठेवण्यात कायम आले. मध्यंतरानंतर इंटर मिलानने बार्सिलोनाला चांगला लढा दिला. पण बार्सिलोनानेही आपले आक्रमण सुरू ठेवले. मात्र दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अखेर ८३ व्या मिनिटाला जोर्डी अल्बाने गोल करून बार्सिलोनाची आघाडी २-० अशी केली. ही आघाडी त्यांना सामना संपेपर्यंत ठेवण्यात यश आले. त्यामुळे त्यांनी हा सामना २-० असा जिंकला.

लिव्हरपूलचाही विजय

इंग्लिश संघ लिव्हरपूलचाही विजय झाला. त्यांनी रेड स्टार संघाचा ४-० असा पराभव केला. त्यांच्यासाठी फेर्मीनो (२० मी.), सलाह (४५,५१ मी.) आणि साडीओ माने (८० मी.) यांनी गोल केले.
First Published on: October 25, 2018 11:20 PM
Exit mobile version