Under 19 Asia Cup: श्रीलंकेला ८ वेळा पराभूत करत भारताने जिंकला एशिया कप, वर्ल्डकपसाठी संघ तयार

Under 19 Asia Cup: श्रीलंकेला ८ वेळा पराभूत करत भारताने जिंकला एशिया कप, वर्ल्डकपसाठी संघ तयार

Under 19 Asia Cup: श्रीलंकेला ८ वेळा पराभूत करत भारताने जिंकला एशिया कप, वर्ल्डकपसाठी संघ तयार

भारतीय अंडर-१९ टीम आशिया चषक चॅम्पियन बनली आहे. भारतीय संघाने शुक्रवारी दुबईमध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेला ९ विकेटनं पराभूत केल आहे. जूनियर टीम इंडिया ८ वेळा आशिया कप जिंकण्यात यशस्वी झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने उत्कृष्ठ खेळी करत पुनरागमन केले आणि श्रीलंकेला धूळ चारली आहे.

भारतीय अंडर १९ संघ आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात व्यत्यय आल्यामुळे ५० षटकांचा सामना ३८ षटकांचा करण्यात आला. पावसापूर्वी श्रीलंकेच्या डावातील ३२ षटके पूर्ण झाली होती. तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला फक्त ६ षटके खेळायला मिळाली होती. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यांना निर्धारित ३८ षटकांत ९ गडी गमावून १०६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेने ३२ व्या षटकापर्यंत ७ विकेट गमावल्या होत्या.

भारताला १०२ धावांचे लक्ष्य मिळाले

भारतीय संघाकडू फिरकीपटू विकी ओस्टवाल आणि कौशल तांबेने एकूण ५ विकेट घेतले आहेत. तर डकवर्थ लूईस नियमानुसार भारतीय संघाला ३८ षटकांमध्ये १०२ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने सुरुवातीला खराब प्रदर्शन करत केवळ ८ धावांवर १ विकेट गमावला होता. हरनूर सिंहने केवळ ५ धावा करत विकेट गमावली होती. यानंतर सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी ५६ आणि शेख रशीद ९६ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला ८ व्यांदा आशिया चषक जिंकून दिला. भारताने २१.३ षटकांमध्ये १०४ धावांचे लक्ष्य गाठत १ विकेट गमावला आहे.

भारतीय अंडर १९ संघाने तब्बल ९ वेळा आशिया चषक खेळला आहे. त्यापैकी भारताने ८ वेळा विजेतेपद पटाकवले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून २०१७ मध्ये आशिया कप जिंकला आहे. तर २०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना टाय झाल्यामुळे ट्रॉफीची वाटणी झाली होती.


हेही वाचा : बुमराह नाही तर शमीच भारताचा सर्वोत्तम गोलंदाज, आकाश चोप्राचे मत

First Published on: December 31, 2021 9:00 PM
Exit mobile version