घरक्रीडाबुमराह नाही तर शमीच भारताचा सर्वोत्तम गोलंदाज, आकाश चोप्राचे मत

बुमराह नाही तर शमीच भारताचा सर्वोत्तम गोलंदाज, आकाश चोप्राचे मत

Subscribe

जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो भारताचा वेगवान गोलंदाजांमध्ये वेगळा आहे. सेंच्युरियनमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय झाला होता त्यामध्ये बुमराहचा मोलाचा वाटा होता. अनेकजण बुमराहला जागतिक क्रिकेटमध्ये चांगला गोलंदाज म्हणून ओळखतात परंतु भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राला जसप्रीत बुमराह हा भारतीय कसोटी संघातील क्रमांक १ चा गोलंदाज वाटत नाही. आकाश चोप्रा म्हणाला की, बुमराह वेगवान आणि खास गोलंदाज आहे. पंरतु जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी १ क्रमांकचा गोलंदाज ठरवण्याची वेळ येते आली तर तो मोहम्मद शमी असावा. त्यामुळे शमीची निवड करण्यात कोणताही संकोच नाही असे आकाश चोप्रा म्हणाला आहे.

भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणाला की, जेव्हा तुम्ही बुमराहला पाहिल्यावर तो खास दिसतो. पण भारतीय संघासाठी चांगला गोलंदाजाबद्दल बोलायचे झाले तर तो मोहम्मद शमी आहे. शमी आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना प्रश्न विचारत असतात. शमीने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट घेतले होते. तर सेंच्युरियनमध्ये प्रोटियाजविरुद्ध ५ विकेट घेण्याची कमाल केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेत शमीने एकूण ८ विकेट घेतले होते. या सामन्यात बुमराह, लुंगी एनगीडी आणि रबाडाने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र शमीने ज्या प्रमाणे आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला त्याचा आकाश चोप्रावर चांगला प्रभाव पडला असल्याचे दिसते आहे.

- Advertisement -

आकाश चोप्रा म्हणाला की, लुंगी एनगीडीचा चपळपणा पाहिला, रबाडाची खेळी पाहिली तर बुमराहची जादू पाहिली परंतु शमीच्या बाबत काय? शमी, बुमराहसारखी गोलंदाजी करत नाही. पण लागोपाठ चांगली गोलंदाजी करत स्टंपच्या जवळ चेंडू टाकत असतो. सामन्यामध्ये स्टंपच्या सर्वात जवळ कोणी गोलंदाजी केली असेल तर तो शमीच असल्याचे आकाश चोप्राने सांगितले आहे.


हेही वाचा :  २०२१ मध्ये सर्वाधिक कसोटी सामन्याच्या क्रमवारीत भारतीय संघ अग्रस्थानी, पाकिस्तानलाही टाकलं मागे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -