वर्ल्डकप फायनलमध्ये शतक केलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

वर्ल्डकप फायनलमध्ये शतक केलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

२०१२ सालचा १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारा भारतीय संघ

भारतीय संघाने २०१२ सालचा १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने (Unmukt Chand Retires) भारतीय क्रिकेटला अलविदा केले आहे. सलामीवीर असलेला चंद आता परदेशातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळणार आहे. भारताने २०१२ सालच्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. या सामन्यात कर्णधार चंदने नाबाद १११ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. परंतु, त्यानंतर सिनियर क्रिकेटमध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे २८ वर्षीय चंदने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

मागील काही वर्षांत घडलेल्या गोष्टींबाबत मी पूर्णपणे समाधानी नाही. परंतु, सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवून आणि चांगल्या आठवणींसह मी बीसीसीआयला अलविदा करत आहे. जगभरात विविध संधींसाठी मी उत्सुक आहे. क्रिकेट हा जगभर खेळला जाणारा खेळ आहे. यशाचे मार्ग कदाचित बदलत जातील, पण अखेर तुमचे लक्ष्य हे सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणे हेच असते, असे चंद सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाला.

First Published on: August 13, 2021 9:24 PM
Exit mobile version