US OPEN 2018 : आणि ओसाका झाली भावूक

US OPEN 2018 : आणि ओसाका झाली भावूक

नोओमी ओसाका

अमेरिकन ओपनचा अंतिम सामना नुकताच पार पडला असून जपानच्या नाओमीने दिग्गज टेनिसपटू सेरेनाला अंतिम सामन्यात ६-२ आणि ६-४ अशा सरळ सेट्समध्ये नमवत विजेतेपद मिळवले आहे. विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत मात्र ओसाका भावूक झाली आहे. ओसाका आपल्या आणि सेरेनाबद्दल बोलताना भावनिक झाली आहे.

वाचा – US OPEN 2018 : सेरेनाला मात देत ओसाका ठरली विजेती

काय म्हटली ओसाका?

ओसाकाने सामन्यानंतर बोलताना सांगिलतेकी,”मला आणि सर्वांनाच माहित होताकी सेरेनाला तिचा २४ वं ग्रँड स्लॅम जिंकायचा होता आणि जेव्हा मी खेळायला मैदानावर उतरले तेव्हा मी सेरेना फॅन किंवा काही नव्हते तर एक टेनिस प्लेयर होते जी दुसऱ्या टेनिस प्लेयरविरूद्ध खेळत आहे. मात्र सामन्यानंतर जेव्हा मी सेरेनाला मिठी मारली तेव्हा मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारख वाटलं.” हे बोलत असतानाच ओसाकाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती भावूक झाली. संबधित मुलाखतीचा एक व्हिडिओही अमेरिकन ओपनने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

ओसाकाने रचला इतिहास

जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकाने दिग्गज टेनिसपटू सेरेनाला नमवत आपले पहिले ग्रँडस्लॅम जिंकले या विजयासोबतच ग्रँडस्लॅम जिंकणारी नाओमी जपानची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे. तिच्या या विजयाबरोबरच तिने सेरनाचे २४ व्या ग्रँड स्लॅम विजयाचे स्वप्न तोडले आहे.

First Published on: September 9, 2018 10:43 AM
Exit mobile version