विराटने दिल्या “भावाला” शुभेच्छा

विराटने दिल्या “भावाला” शुभेच्छा

विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स

एबी डीव्हिलियर्सला निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी दिल्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट याने स्वतःचा भाऊ मानत असलेल्या एबी डीव्हिलियर्स याला त्याच्या निवृत्तीबदल शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी त्याने हे ट्विट केले असून त्यात त्याने एबीचे आभार मानत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने २३ मे रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे आपण आता थकलो आहोत आणि इतरांना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेत असल्याचे सांगत एबी याने क्रिकेट जगताला अलविदा म्हटले आहे.

एबीच्या या निर्णयावर सर्व जगातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशावेळी त्याचा जवळचा मित्र आणि आयपीएलच्या संघातील सोबती विराट कसा मागे राहील ? नुकत्याच काही वेळापूर्वी विराट याने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एबी याला शुभेच्छा देत ट्विट केले आहे.


एबी डीव्हिलियर्सच्या करियरचा घेतलेला धावता आढावा

एबी डीव्हिलियर्स याने २००४ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १४ वर्षाच्या आपल्या करियरमध्ये २२८ एकदिवसीय सामन्यात २५ शतकांसह ८,७६५ रन , ११४ कसोटी सामन्यात २२ शतकांसह ९,५७७ रन केले आहेत तसेच टी-२० मध्ये ७८ सामन्यात १६७२ रन बनविले असून १० अर्धशतकं आपल्या नावावर केली आहेत. सुरुवातीला विकेटकिपिंग करत असताना देखील एबीने उत्तम खेळ दाखवत १७ स्टम्पिंग केले आहेत तसेच विकेटकीपिंग आणि फिल्डिंग करत असताना तब्बल ४६३ झेल पकडले होते. या सर्वांसह त्याचे इंडियन प्रीमियर लीगमधील प्रदर्शन तर उल्लेखनीय आहे. रॉयल चॅलेंजर्स कडून खेळताना त्याने नवनवीन प्रकारचे शॉट्स खेळत सर्वाना अचंबित केले होते.

First Published on: May 26, 2018 12:24 PM
Exit mobile version