IPL 2020 : कोहलीचे दमदार अर्धशतक; आरसीबी ४ बाद १६९

IPL 2020 : कोहलीचे दमदार अर्धशतक; आरसीबी ४ बाद १६९

विराट कोहली 

कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६९ अशी धावसंख्या उभारली. कोहलीने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९० धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठरले. याआधी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ७२ धावा केल्या होत्या. तर त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले (४३) हुकले होते. आजच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याने अप्रतिम फलंदाजी केली.

कोहली, दुबेची फटकेबाजी 

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आरसीबीचा सलामीवीर फिंच अवघ्या २ धावा करून बाद झाला. त्याचा दीपक चहरने त्रिफळा उडवला. यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कोहलीने ५३ धावांची भागीदारी रचत आरसीबीच्या डावाला आकार दिला. पडिक्कलला आक्रमक शैलीत फलंदाजी करता आली नाही. ३४ चेंडूत ३३ धावा केल्यावर त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. ठाकूरनेच मग एबी डिव्हिलियर्सला माघारी पाठवले. एबीला खातेही उघडता आले नाही. पुढे वॉशिंग्टन सुंदरही केवळ १० धावा करू शकला. यानंतर मात्र कोहली आणि शिवम दुबेने फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. या दोघांनी अखेरच्या पाच षटकांत ७० हून अधिक धावा फटकावल्या. कोहलीने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद ९० धावा केल्या, तर दुबे १४ चेंडूत २२ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे आरसीबीने २० षटकांत ४ बाद १६९ अशी धावसंख्या केली.

First Published on: October 10, 2020 10:15 PM
Exit mobile version