India vs SA 2021 : एकदिवसीय मालिकेसाठी विराट सज्ज, बीसीसीआयकडे विश्रांतीसाठी वेळ मागितल्याच्या अफवा, विराट कोहलीचं स्पष्टीकरण

India vs SA 2021 : एकदिवसीय मालिकेसाठी विराट सज्ज, बीसीसीआयकडे विश्रांतीसाठी वेळ मागितल्याच्या अफवा, विराट कोहलीचं स्पष्टीकरण

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेवरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यातून माघार घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, महत्त्वाचं म्हणजे मी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामना खेळण्यास तयार आहे. तसेच बीसीसीआयकडे विश्रांतीसाठी वेळ मागितल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. असा आरोप विराट कोहलीने केला आहे.

कर्णधार विराट कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, बीसीसीआयशी माझा संवाद झालेला नाहीये. मला विश्रांती घ्यायची होती याबाबात वेळ मागितल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मीटिंगच्या १.५ तास आधीच मी संपर्क साधला होता. मुख्य निवडकर्त्याने कसोटी संघावर चर्चा केली होती. तसेच ५ निवडकर्त्यांनी मला सांगितलं होतं की, मी एकदिवसीय खेळल्या जाणाऱ्या मालिकेचा कर्णधार होणार नाही. असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

दरम्यान, मी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळण्यास तयार आहे. तसेच बीसीसीआयला मी कधीही विश्रांतीसाठी विचारले नव्हते. असं स्पष्टीकरण कोहलीने दिलं आहे.

रोहित शर्माबाबत विराटचं वक्तव्य

रोहित शर्माबाबत विराट कोहलीने वक्तव्य केलं आहे. यामध्ये विराट म्हणाला की, रोहितचं संघामध्ये नसणं म्हणजे कठीण आहे. कसोटी मालिकेदरम्यान रोहितचं संघामध्ये नसणे हे संपूर्ण क्रिकेट पटूंसाठी धक्कादायक आहे. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो संघामध्ये खेळणार नाही. त्यामुळे त्याची कमी जाणावणार आहे.

कर्णधारपदाबाबत विराटचं वक्तव्य

कर्णधारपदावरून काढल्यानंतर माझ्या फलंदाजीवर फारसा परिणाम होणार नाही. जेव्हा मी भारतासाठी खेळतो. तेव्हा मी माझं सर्वस्व अर्पण करतो. मी भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये ज्या प्रकारे योगदान दिले तेच मी पुढेही करत राहीन. असं विराट म्हणाला.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका

पहिला सामना – २६-३० डिसेंबर, सेंचुरियन
दुसरा सामना – ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा सामना – ११-१५ जानेवारी, केपटाउन

रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचालला संधी

रोहित शर्मा फलंदाजी करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो आगामी कसोटी मालिकेला देखील मुकणार आहे. मात्र, आता हिटमॅन रोहित शर्माच्या जागेवर भारतीय संघात युवा खेळाडू प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे.

First Published on: December 15, 2021 2:20 PM
Exit mobile version