IPL 2022, Corona Positive: RCB ने बोली लावलेला सर्वात महागडा खेळाडू वनिंदू हसरंगा कोरोना पॉझिटिव्ह

IPL 2022, Corona Positive: RCB ने बोली लावलेला सर्वात महागडा खेळाडू वनिंदू हसरंगा कोरोना पॉझिटिव्ह

आयपीएल २०२२ च्या स्पर्धेला येत्या काही दिवसांमध्येच सुरूवात होणार आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पाडलं. यामध्ये अनेक स्टार खेळाडूंवर कोट्यवधी रूपयांची बोली लागली. तर काही खेळाडू अनसोल्ड ठरले. मात्र, आयपीएल स्पर्धेच्या लिलावानंतर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा ठरलेला खेळाडू आणि श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदु हसरंगाला कोरोनाची लागण झाली आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये टी-२० मालिकेचे तीन सामने खेळले जाणार आहेत. परंतु हसरंगाला कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे टीमला मोठा धक्का बसलाय. सध्या वनिंदुला आयसोलेशन करण्यात आलंय. हसरंगाची रॅपिड एँटिजन टेस्ट चाचणी करण्यात आल्याची माहिती श्रीलंका बोर्डाने दिली आहे. हसरंगा यावेळी कोविड-१९ च्या प्रोटोकॉलचं पालन करत आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आतापर्यंत दोन मालिकांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये वनिंदु हसरंगाने गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना आकर्षित केलं. विराट कोहलीच्या आरसीबी संघाने हसरंगाला १०.७५ कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. तसेच त्याची मूळ किंमत एक कोटी इतकी होती. भारतामध्ये झालेल्या ऑक्शनच्या किंमतीनुसार श्रीलंकामध्ये हसरंगाने ३० कोटींचा करार आयपीएलमध्ये केला आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू टीम

रिटेन्शन लिस्ट – विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (७ कोटी)

यष्टीरक्षक – फाफ डु प्लेसिस (७ कोटी), दिनेश कार्तिक (५.५० कोटी), अनुज रावत (३.४० कोटी), एल. सिसोदिया (२० लाख)

ऑलराऊंडर – हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनीश्वर गौतम, डेव्हिड व्हिली

गोलंदाज – आकाश द्विप, जोश हेजलवुड, जेसन बेहरनडॉर्फ, चामा मिलिंद, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल

स्क्वॉड स्ट्रेन्थ – २२ (१४ भारतीय, ८ विदेशी)


हेही वाचा : Fodder Scam Case: चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय


 

First Published on: February 15, 2022 2:58 PM
Exit mobile version