Waqar younis : वकार युनिसचा अखेर माफीनामा; नमाजच्या कमेंटवर टीका झाल्याने स्पष्टीकरण

Waqar younis : वकार युनिसचा अखेर माफीनामा; नमाजच्या कमेंटवर टीका झाल्याने स्पष्टीकरण

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिसच्या एका कमेंटमुळे क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. वकारच्या वक्तव्यावर अनेक आजी माजी खेळाडूंनी सडेतोड टीका केली आहे. वकारच्या आक्षेर्पाह कमेंटवर अखेर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केल्याने अखेर वकारला या प्रकरणात माफीनामा सादर करावा लागला. बुधवारी टी 20 विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर वकारने नमाजच्या निमित्ताने टीका केली होती. पण या कमेंटमुळे वकार भलताच अडचणीत आला. पण वकारने या नमाजशी संबंधित वादग्रस्त नमाज टिप्पणीबद्दल अखेर माफी मागितली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या माफीनाम्याची माहिती दिली.

“त्या क्षणी मी जे काही बोललो त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्या वक्तव्यामागील माझा काहीच हेतू नव्हता ही माझी एक चूक झाली आहे. मी त्याबद्दल माफी मागतो आहे, खेळ हा वंश,रंग किंवा वंशाचा काहीसा विचार न करता सर्वाना एकत्र आणत असतो. अशा शब्दांत वकार युनिसने ट्विटरवरून आपण माफी मागत असल्याची माहिती दिली. रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद रिझवानने लंच ब्रेकच्या दरम्यान मैदानावरच नमाज अदा केली होती, ह्या प्रकरणावर वकार युनिसने केलेल्या टिप्पणीवरून क्रिकेट वर्तुळात मोठी नाराजी पसरली होती.

एका वृत्तवाहिनीला माहिती देताना वकार युनिसने सांगितले की, “बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान भारताविरूध्दच्या सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करत होते, लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद रिझवानने ज्या ठिकाणी नमाज अदा केली, ती जागा हिंदूनी वेढलेली आहे ते सर्वकाही माझ्यासाठी खूप वेगळे आणि खास होते. वकार युनिसच्या या वक्तव्यावर समालोचक हर्षा भोगले यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू हे खेळाचे राजदूत असतात त्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे, अशा शब्दांत हर्षा भोगले यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सोबतच भारताचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद, आकाश चोप्रा आणि वसीम जाफर यांनी देखील युनिसच्या वक्तव्यावर खंत व्यक्त केली आहे.

रविवारच्या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. रिझवानने (७९),तर बाबरने (६८), धावा करत पाकिस्तानला एकहाती विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 152 धावांचे आव्हान गाठताना एकही बळी न गमावता भारताविरूध्द सलामीचा सामना आपल्या नावावर करून विश्वचषकातील एका मोठ्या विक्रमाला मोडीत काढले .


हेही वाचा T20 world cup 2021 : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला होणार फायदा, वाचा समीकरण

First Published on: October 27, 2021 3:11 PM
Exit mobile version