वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

विंडीजच्या विजयात कर्णधार किरॉन पोलार्डची चमक

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पोलार्डने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली. पोलार्डने केलेल्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली असली तरी, तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.

2007 साली पोलार्डने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. 20 फेब्रुवारीला भारताविरुद्ध कोलकाता येथे तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. त्यावेळी अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा क्रिकेटपटू आहे.

पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी 123 वनडे आणि 101 टी 20 सामने खेळला. पोलार्ड वेस्ट इंडिजसाठी कधीही कसोटी सामना खेळला नाही. वनडे आणि टी 20 खेळाडू म्हणूनच पोलार्डकडे पाहिलं गेलं.


हेही वाचा – IPL 2022: ‘मुंबई’ला विजयासाठी संघात ‘तेंडुलकर’ नाव जोडण्याची गरज; मोहम्मद अझरुद्दीन यांचा सल्ला

First Published on: April 20, 2022 10:49 PM
Exit mobile version