जे झाले ते चांगले नाही झाले

जे झाले ते चांगले नाही झाले

अंतिम सामन्यावर मॉर्गनची प्रतिक्रीया

2019 च्या वर्ल्डकपचा अंतिम सामना आजवरच्या वर्ल्डकपच्या इतिहासातील अंतिम सामन्यांपेक्षा रोमहर्षक असाच होता. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेला हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला आणि सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. त्यानंतर यजमान इंग्लंडला जास्त चौकार या नियमाद्वारे इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.त्यानंतर आयसीसीच्या या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली.

आता स्वत: इंग्लंड संघाचा कर्णधार ईऑन मॉर्गनने या निकालावर आपले मत व्यक्त केले आहे. जे झाले ते योग्य नाही असे मॉर्गनने म्हटले आहे.मी स्पष्टवक्ता असून अशा सामन्यांचे अशाप्रकारचे निकाल येणे योग्य नाही,असे मॉर्गनने म्हटले आहे. दोन्ही संघांतील सामना चुरशीचा झाला.

सामन्यावेळी ‘मी तिथे होतो आणि मला माहित आहे की काय झाले, परंतु ,नेमक्या कोणत्या क्षणी आम्ही जिंकलो किंवा हरलो तो क्षण सांगता येणार नाही.किंवा आम्हीच जिंकलो हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकत नाही,सामन्यादरम्यान तशी संधीही मिळाली नाही,असेही त्याने प्रांजळपणे कबूल केले आहे.

सामन्यानंतर विल्यमसनशी चर्चा

सामन्यानंतर मी विल्यमसनशी चर्चा केली.तो आणि मी आयपीएलपासून एकमेकांशी संपर्कात असल्याने एकमेकांचे आता घट्ट मित्र झालो आहोत,असे मॉर्गन म्हणाला.मी अशा प्रकारांच्या निकालांबाबत विचारही करू शकत नाही.परंतु,आपल्याला आनंदी राहणे महत्वाचे.मी किंवा विल्यमसन आता कोणतीही प्रतिक्रीया देण्याच्या परिस्थितीत नाही,असेही तो म्हणाला.

First Published on: July 21, 2019 4:40 AM
Exit mobile version