वॉर्नर होणार टी-२० क्रिकेटमधून निवृत्त?

वॉर्नर होणार टी-२० क्रिकेटमधून निवृत्त?

ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज सलामीवीर डेविड वॉर्नर लवकरच टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. मागील काही काळात बरेच खेळाडू जगभरातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळता यावे यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नर मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट दीर्घ काळ खेळण्यास उत्सुक असून यासाठी तो टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास तयार आहे. नुकताच वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

तुम्ही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा विचार कराल तर आता सलग दोन विश्वचषक होणार आहेत. काही वर्षांत मी टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. सतत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (टी-२०, कसोटी, एकदिवसीय) खेळत राहणे खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे. ज्या खेळाडूंना तिन्ही प्रकार खेळायचे आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो.

मी एबी डिव्हिलियर्स, विरेंद्र सेहवाग यांच्याशी चर्चा करत असतो. त्यांनी बरीच वर्षे क्रिकेटचे तिन्ही प्रकार खेळले. मात्र, काही काळानंतर त्यांनाही हे आव्हानात्मक वाटू लागले, असे वॉर्नर म्हणाला. वॉर्नरने आतापर्यंत ७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३०.५७ च्या सरासरीने २०७९ धावा केल्या आहेत.

First Published on: February 12, 2020 6:07 AM
Exit mobile version