महिला प्रीमियर लीगच्या लिलावाला सुरुवात, स्मृती मंधानावर सर्वाधिक बोली

महिला प्रीमियर लीगच्या लिलावाला सुरुवात, स्मृती मंधानावर सर्वाधिक बोली

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भारताची क्रिकेटर स्मृती मंधानावर सर्वाधिक रुपयांची बोली लागली आहे. स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४० कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला १.८० कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनरला गुजरात जायंट्सने ३.२० कोटी रुपयांना संघात घेतलं आहे.

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटर एश्ले गर्डनरला गुजरात जायंट्सने संघात घेतलं आहे. मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरिअर्स यांच्यात जोरदार चढाओढ बघायला मिळाली.

कोणकोणत्या खेळाडूंवर आतापर्यंत लागली बोली?

आरसीबी – स्मृती मंधाना – ३.४० कोटी (बेस प्राइज ५० लाख)

मुंबई इंडियन्स – हरमनप्रीत कौर – १.८० कोटी (बेस प्राइज ५० लाख)

आरसीबी – सोफी डिवाइन ५० लाख (बेस प्राइज ५० लाख)

गुजरात जायंट्स – एश्ले गार्डनर – ३.२० कोटी (बेस प्राइज ५० लाख)

युपी वॉरिअर्स – दिप्ती शर्मा – २.६० कोटी

दिल्ली – जेमिमाह रॉड्रीग्ज – २.२० कोटी

आरसीबी -एलिस पेरी – १.७० कोटी (बेस प्राइज ५० लाख)

आरसीबी रेणुका सिंह – १.६० कोटी

महिला प्रीमियर लीगमध्ये पाच फ्रँचाइजी आहेत. यामध्ये अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, बंगलोर आणि दिल्लीच्या संघांचा समावेश आहे. गुजरात जायंट्स, युपी वॉरिअर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावे आहेत.


हेही वाचा : कौतुकास्पद! आर माधवनच्या मुलाने महाराष्ट्रासाठी पटकावले ५ गोल्ड मेडल


 

First Published on: February 13, 2023 4:50 PM
Exit mobile version