भारताची विजयाची हॅट्रिक; न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय

भारताची विजयाची हॅट्रिक; न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय

india win over the new zealand

आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवून हॅटट्रिक नोंदवली आहे. भारताने प्रथम ऑस्ट्रेलियाचा नंतर बांगलादेशचा पराभव करून आता न्यूझीलंडवरही विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज पुन्हा एकदा शेफाली वर्माने जबरदस्त खेळी केली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शेफालीने ३४ चेंजूत ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. त्यात ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. मात्र अर्धशतकाने तिला हुलकावणी दिली.

स्मृती मानधनांन चौकार खेचून धावांचे खाते उघडले मात्र तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. ८ चेंडूत केवळ ११ धावा केल्या. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या पूनम यादवने १९ वया षटकामध्ये अॅमेली केरने १८ धावा चोपून काढताना चूरस निर्माण केली. अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हायली जेन्सनला चौकार मिळाला. शिखा पांडेंने अचूक मारा करताना न्यूझीलंडला ३ धावांनी हार मानण्यास भाग पाडले.


हेही वाचा- ‘बांगलादेशी दाखवा पाच हजार मिळवा’; मनसेचा नवा फंडा


 

First Published on: February 27, 2020 12:47 PM
Exit mobile version