टी२० विश्वचषक: भारतीय महिलांची पुन्हा बाजी

टी२० विश्वचषक: भारतीय महिलांची पुन्हा बाजी

womens t20 worldcup 2020 india win over bangladesh

भारताच्या महिला क्रिकेट संघाचा टी-२० वर्ल्ड कपमधील झंझावत सोमवारीही सुरुच राहिला. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांग्लादेशचा १८ धावांनी पराभव केला. मात्र त्याचवेळी आघाडीच्या फलंदाजांचे अपयश तायन राहिल्याने या विजयानंतरही भारतीय संघावर चिंतेचे ढग कायम राहिले. चांगल्या सुरूवातीनंतरही भारताला २० षटकांत ६ बाद १४२ धावांची समाधानकारक मजल मारली. यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी केलेल्या माऱ्याच्या जोरावर भारताने बांग्लादेशला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर बाजी मारली.

तत्पूर्वी, युवा सलामीवीर शेफाली वर्माच्या तडाखेबंद सुरूवातीनंतरही भारताला मोठी मजल मारता आली नाही. शेफालीने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावा केल्या. त्याचवेळी, हुकमी सलामीवीर स्मृती मानधनाला ताप आल्याने या सामन्यात तिच्या जागी युवा रिचा घोषला संधी मिळाली. तिने ही संधी साधताना १४ चेंडूत २ चौकारांसह १४ धाव केल्या. मुंबईकर युवा जोमिमा रॉड्रिग्जने मात्र भारताला सावराताना ३७ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावांची भक्कम खेळी केली.

पुनमची पुन्हा विकर्मी कामगिरी

पूनम यादवने या सामन्यात पुन्हा एकदा आपली विक्रमी कामगीरी केली आहे. जगातल्या सर्वात वेगवान ओळखल्या जाणऱ्या खेळपट्टीवर तिने धुमाकूळ घातला आहे. पूनमने बांग्लादेशविरूद्ध एकूण २० बळी मिळवताना एकता बिस्तचा विक्रम मोडला आहे. भारताने बांग्लादेशसमोर १४३ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र त्यांना २० षटकांमध्ये ८ बाद १२४ धावाच करता आल्या. निगार सुल्तानाने ३५ धावांची तर मुर्शिदा खातूनने ३० धावांची खेळी साकारली, पण त्यांना बांग्लादेशला विजय मिळवून देता आला नाही. लेगस्पिनर पूनम यादव पुन्हा एकदा भारतासाठी धावून आली. पहिल्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजवणाऱ्या पूनम यादवने याही लढतीत तीन फलंदाज बाद केले. तिने १८ धावा देऊन तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

First Published on: February 25, 2020 3:10 PM
Exit mobile version