कुल्टर-नाईलने इंडिच्या तोंडातला घास हिकावला; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी

कुल्टर-नाईलने इंडिच्या तोंडातला घास हिकावला; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी

कुल्टर-नाईलने इंडिच्या तोंडातला घास हिकावला; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क आणि नेथन कुल्टर-नाईल या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे वेस्ट इंडिजच्या हातातील सामना निसटला आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला आहे. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंडिजच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यांपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पायपीट झाली. मात्र, स्टिव्ह स्मिथ आणि नेथन कुल्टर-नाईलच्या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना इंडिजची सुरुवात हवी तशी झाली नाही. सलामीवीर ख्रिस गेल आणि लेविन स्वस्तात तंबूत परतले. होपने एकहाती डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला पुरान आणि हेटमायरने साथ दिली. मात्र तो ६८ धावांवर बाद झाला. त्यानंतर होल्डरने आपले अर्धशतक साजरी केले. मात्र ५१ धावांवर तो बाद झाला. होल्डरनंतर आंद्रे रसेल देखील स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंडिजचे फलंदाज हवे तसे टिकू शकले नाही. अखेर ५० षटकांत इंडिज ९ बाद २७३ धावांपर्यंत पोहचू शकले. त्यामुळे १५ धावांनी ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.

या सामन्यात सुरुवातीच्या फलंदाजांना चांगले प्रदर्शन करण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाची ५ बाद ७९ अशी अवस्था होती. मात्र स्मिथने ७३ आणि आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुल्टर-नाईलने ९२ धावांची खेळी केली. कुल्टर-नाईलच्या खेळीचे विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने केलेल्या या दुसऱ्या सर्वाधिक धावा आहेत.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजचे गोलंदाज शेल्डन कॉटरेल, आंद्रे रसेल आणि ओशेन थॉमस यांच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अॅरॉन फिंच (६), डेविड वॉर्नर (३), उस्मान ख्वाजा (१३), ग्लेन मॅक्सवेल (०), मार्कस स्टोइनिस (१९) हे खेळाडू झटपट माघारी परतले. यानंतर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांनी मात्र संयमाने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केल्यावर ४५ धावांवर खेळणाऱ्या कॅरीला रसेलने शाई होपकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. स्मिथने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ७७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला कुल्टर-नाईलने चांगली साथ दिली. कुल्टर-नाईलने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ४१ चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे संयमाने खेळणाऱ्या स्मिथला ७३ धावांवर थॉमसने माघारी पाठवले. त्याने आणि कुल्टर-नाईलने सातव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. कुल्टर-नाईल मोठा फटका मारण्याच्या नादात कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ६० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. यानंतर ब्रेथवेटनेच स्टार्कला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २८८ धावांत संपुष्टात आला.

First Published on: June 6, 2019 11:14 PM
Exit mobile version