T-20 : ‘या’ खेळाडूचा विक्रम मोडत सूर्यकुमार यादवने रचला इतिहास

T-20 : ‘या’ खेळाडूचा विक्रम मोडत सूर्यकुमार यादवने रचला इतिहास

भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने तुफानी फलंदाजीच्या जोरावर इतिहास रचला आहे. सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार अपयशी ठरला होता. या सामन्यात त्याला केवळ 15 धावा करता आल्या. मात्र, नेदरलॅंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यातील कसर भरून काढली आहे. कारण सूर्याने या सामन्यात तुफानी फटकेबाजी तर केलीच, पण त्याचबरोबर आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला जे जेमले नाही ते सूर्याने करून दाखवले आहे. (World Record Of Suryakumar Yadav In T20 Created History)

सूर्यकुमारने यावेळी अखेरच्या चेंडूवर आपले अर्धशतक साजरे केले. पण हे अर्धशतक झळकावण्यापूर्वी त्याने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. यावर्षी झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये सूर्या चांगल्या फॉर्मात होता. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होत्या. मात्र, सूर्यकुमारने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी केली. आपल्या नावावर हा विश्वविक्रम करत इतिहास रचला. या वर्षातील टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा या सूर्याच्या नावावर आता जमा झाल्या आहेत. त्याचबरोबर सूर्या आता चांगल्या फॉर्मात आहे.

टी-20 विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना आज नेदरलँडसोबत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 180 धावांचे आव्हान नेदरलँडसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना सुरू असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. तसेच, नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले.


हेही वाचा – IND vs NED : रोहित, विराट, सूर्याची धमाकेदार फिफ्टी; नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्हान

First Published on: October 27, 2022 4:03 PM
Exit mobile version