भारताने वर्ल्डकप जिंकण्यात तुझा ‘गंभीर’ वाटा होता !

भारताने वर्ल्डकप जिंकण्यात तुझा ‘गंभीर’ वाटा होता !

सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर

भारताचा फलंदाज गौतम गंभीर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. रणजी ट्रॉफीत अांध्र प्रदेश विरुद्धचा पुढील सामना हा त्याचा शेवटचा सामना असेल. हा सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणार आहे. गंभीरने भारताचे ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताने २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक जिंकण्यात गंभीरचा मोलाचा वाटा होता. त्याने बुधवारी आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेक आजी-माजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षकांनी त्याला त्याच्या कारकिर्दीबद्दल ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

तू खूपच खास खेळाडू होतास – सचिन तेंडुलकर 

गंभीरबद्दल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने ट्विट केले. ज्यात त्याने लिहिले की, ‘अप्रतिम कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन. तू खूपच खास खेळाडू होतास आणि भारताने वर्ल्डकप जिंकण्यात तुझा ‘गंभीर’ वाटा होता !’


भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वांत मोठ्या घटनांचा तू भाग होतास – हर्षा भोगले


तुझ्याकडून माझ्यासकट अनेकांना प्रेरणा मिळाली – रविचंद्रन अश्विन 


इतरांकडूनही अभिनंदन 

First Published on: December 5, 2018 5:13 PM
Exit mobile version