“मी मृत्यूला जवळून पाहिलं…”; युजवेंद्र चहलने सांगितला त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक किस्सा

“मी मृत्यूला जवळून पाहिलं…”; युजवेंद्र चहलने सांगितला त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक किस्सा

राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनं त्याच्या जीवनातील एक धक्कादाय किस्सा सांगितला आहे. आयपीएलचा सामना संपल्यानंतर एका खेळाडूने त्याला दारुच्या नशेत १५ व्या मजल्याच्या बालकनीत लटकवल्याचा प्रसंग चहलने सांगितलं. राजस्थानचा फिरकीपटू आर अश्विन आणि चहल बोलत असतानाचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चहने अश्विनला हा किस्सा सांगितला. तसंच, त्यावेळी “मी मृत्यूला जवळून पाहिलं. त्या रात्री मी खूप महत्त्वाचा धडा शिकलो” असं चहल त्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला.

युजवेंद्र चहल २०२३ साली मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता त्यावेळी हा प्रसंग त्याचासोबत घडला होता. “२०१३ साली मी मुंबई इंडियन्सकडून खेळायचो. बँगलोरमध्ये आमची मॅच होती. सामन्यानंतर एक गेट-टुगेदर होतं. एक खेळाडू प्रचंड दारु प्याल्यामुळे नशेत होता. मी त्याचं नाव घेणार नाही. तो बऱ्याच वेळापासून माझ्याकडे पहात होता. त्याने मला बोलावलं. तो मला बाहेर घेऊन गेला व बाल्कनीमध्ये त्याने मला लटकवलं. इतरांनी ज्यावेळी हा प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी माझी सुटका केली. या सर्व प्रकारानंतर मला चक्कर आल्यासारखं झालं” असं युजवेंद्रनं सांगितलं.

चहलनं त्या खेळाडूचं नाव उघड केलं नाही. फक्त या प्रसंगातून योग्य तो बोध घेतल्याचं त्यानी सांगितलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याआधी चहल मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. त्यावेळी त्याची बेस प्राइस १० लाख रुपये होती. चहल बुगळुरूचा अविभाज्य भाग समजला जायचा. पण या २०२१ मध्ये आरसीबीनें त्याला रिलीज केलं. चहल आता राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो.


हेही वाचा – IPL 2022: लखनऊच्या विजयानंतर IPLच्या गुणतालिकेत बदल; जाणून घ्या कोणता संघ कितव्या स्थानी?

First Published on: April 8, 2022 2:16 PM
Exit mobile version