घरक्रीडाIPL 2022: लखनऊच्या विजयानंतर IPLच्या गुणतालिकेत बदल; जाणून घ्या कोणता संघ कितव्या...

IPL 2022: लखनऊच्या विजयानंतर IPLच्या गुणतालिकेत बदल; जाणून घ्या कोणता संघ कितव्या स्थानी?

Subscribe

आयपीएलच्या १५ व्या पर्वात गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनऊनं विजयाची हॅट्रिक केली. या सामन्यात दिल्लीनं विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिलं होतं. लखनऊनं मात्र ते सहजच पार केलं. लखनऊनं ४ बाद १५५ धावा केल्या. लखनऊच्या या विजयानंतर आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत बदल झाले आहेत.

आयपीएलच्या १५ व्या पर्वात गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनऊनं विजयाची हॅट्रिक केली. या सामन्यात दिल्लीनं विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिलं होतं. लखनऊनं मात्र ते सहजच पार केलं. लखनऊनं ४ बाद १५५ धावा केल्या. लखनऊच्या या विजयानंतर आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचे सर्वाधिक ६ गुण आहेत. तर लखनऊ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्यातच लखनौच्या एन्ट्रीने दुसऱ्या संघांना फटका बसला आहे.

या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर गुजरात संघाचेही ४ गण आहेत. तर पंजाब किंग्स पाचव्या स्थानावर आला आहे. दरम्यान, लखनऊच्या विजयानंतर आयपीएलच्या दोन नव्या संघाची जोरदार चर्चा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे. दोन्ही नवे संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहेत. या दोन संघांच्या तुलनेत आयपीएलचे ५ वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळं मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

- Advertisement -

लखनऊ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीनं षटकार ठोकून लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला.

- Advertisement -

६ विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीच्या संघातून गुरुवारी एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले. दरम्यान, या दिल्ली आणि लखनौच्या सामन्यानंतर गुरुवारी पॉईट्सच्या टेबलमध्ये बदल झाले आहेत. रवी बिश्नोईने डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेल या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्याने चार ओव्हर्समध्ये २२ धावा देत दोन विकेट काढल्या.

१५ षटकानंतर हाणामारीच्या ओव्हर्समध्ये खासकरुन शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये आवेश खान आणि जेसन होल्डरने फार धावा दिल्या नाहीत. त्यांनी ऋषभ पंत आणि सर्फराझ खानला जखडून ठेवलं. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला १४९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

दिल्ली कॅपिटल्सला पृथ्वी शॉ ने चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेमध्ये दिल्लीच्या बिनाबाद ५२ धावा झाल्या होत्या. पृथ्वीने ३४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पण पृथ्वी आऊट झाल्यानंतर सात धावात दोन विकेट गेल्या.


हेही वाचा – IPL 2022: ‘या’ युवा फिरकीपटूसमोर डेव्हिड वॉर्नरला फलंदाजी करणं होतंय अवघड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -