अँड्रॉईड Apps आता फ्री नाहीत, भरावे लागणार पैसे

अँड्रॉईड Apps आता फ्री नाहीत, भरावे लागणार पैसे

प्रातिनिधिक फोटो

आजवर आपल्याला हवं असलेलं एखादं अॅप आपण Play Store वरुन मोफत डाऊनलोड करु शकत होतो. मात्र, आता तुम्हाला या Apps साठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या हा बदल युरोपमध्ये करण्यात आला असून, उपलब्ध माहितीनुसार लवकरच भारतीयांनाही हे चार्जेस भरावे लागणार आहेत. सध्या युरोपमध्ये गुगलच्या सुविधा वापरण्यासाठी ४० हजार डॉलर अर्थात ३ हजार रुपये आकारले जात आहेत. The Verge च्या अहवालानुसार प्रत्येक स्मार्टफोन कंपन्यांना गुगलची सेवा घेण्यासाठी ३ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. प्रत्येक देश आणि डिव्हाईसनुसार याचे दर वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. यासाठी कंपन्यांना गुगलसोबत विशिष्ट करार करावा लागणार आहे. ज्या कंपन्या त्यांच्या मोबाईल डिव्हाईसमध्ये Google Chrome आणि सर्च इंजिन इनस्टॉल करु इच्छितात त्यांच्याशी हा करार केला जाईल.


वाचा: ‘हा’ सर्वात स्वस्त iPhone, भारतात लवकरच

काही महिन्यांपूर्वी ‘गुगलने सॅमसंग, हुवावेसारख्या मोबाईल कंपन्यांना गुगल सर्च इंजिन आणि गुगल क्रोम प्री- इन्स्टॉल करण्यासाठी भाग पाडल्याच्या’ आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामुळे गुगलने आता ही अॅप इन्स्टॉल करु इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून गुगलने लायसन्स फी आकारण्य़ाचा निर्णय घेतला आहे. गुगल स्मार्टफोनवर आतापर्यंत ही अॅप मोफत मिळत होती आणि अॅपवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींमधून उत्पन्न घेत होती. मात्र, आता गुगलच्या या नव्या निर्णयानुसार, प्ले स्टोअर आणि अन्य गुगलची अॅप डाऊनलोड करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सुरुवातीला मोबाईल कंपन्याच ग्राहकांच्या वतीने हे चार्जेस भरणार आहेत. मात्र, यामुळे भविष्यात मोबाईलच्या किमती देखील वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


वाचा: आठवीत शिकणाऱ्या गर्भवती मुलीचा संशयास्पद मृत्यू

First Published on: October 22, 2018 4:52 PM
Exit mobile version