घरटेक-वेक'हा' सर्वात स्वस्त iPhone, भारतात लवकरच

‘हा’ सर्वात स्वस्त iPhone, भारतात लवकरच

Subscribe

नव्याने लाँच झालेल्या iPhone च्या मॉडेल्सपैकी iPhone XR हा सर्वात स्वस्त फोन असून, लवकरच भारतात त्याची विक्री सुरु होणार आहे.

अॅपलच्या ‘आयफोन एक्सआर’ या मॉडेलला सध्या सर्वाधिक मागणी आहे. यामील मुख्य कारण आहे iPhone XR ची  कमी किंमत. आयफोनच्या अलीकडे लाँच झालेल्या माॉडेल्सपैकी आयफोन एक्सआर हा सर्वात स्वस्त iPhone आहे. येत्या २६ ऑक्टोबरपासून भारतामध्ये या फोनच्या विक्रिला सुरुवात होणार आहे. अॅपलच्या अधिकृत स्टोअरमधून ग्राहक हा फोन विकत घेऊ शकतात.  iPhone XR ची ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी अशी तीन मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.  ब्लॅक, व्हाईट, ब्लू, पिवळा, लाल आणि कोरल या रंगामध्ये हे मॉडेल उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या फोनची संपूर्ण बॉडी आणि ग्लास अॅल्युमिनिअमपासून बनली असून, त्याचा डिस्प्ले ६.१ इंचाचा आहे.


वाचा: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

अॅपल कंपनीच्या सांगण्यानुसार, iPhone XR या फोनची बॅटरी एकदा चार्ज केली की २४ तासांपर्यंत ती चालू शकते. थोडक्यात या फोनमध्ये चांगला बॅटरी बॅकअप मिळणार आहे. आयफोन एक्सआरला १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या दोन्ही कॅमेरांना सेन्सरही बसवण्यात आले आहेत. हा फोन पूर्णत: वॉटर प्रूफ असून कोणतेही गरम किंवा थंड पेय तसंच सोडा पडला तरीही फोन खराब होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.


वाचा: ट्विटर घेऊन येत आहे नवीन फिचर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -