Work From Home करताय? तर BSNLचा हा प्लॅन देतोय दररोज 5GB डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या

Work From Home करताय? तर BSNLचा हा प्लॅन देतोय दररोज 5GB डेटा आणि ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी या महामारीच्या काळात अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले. अजूनही बरेच लोकं घरातूनच काम करत आहे, कारण कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटचा प्रसार अधिक होताना दिसत आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झालेल्यापासून  दूरसंचार कंपनी वेगवेगळे प्लॅन जारी करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे BSNLचा ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असणार प्लॅन. हा प्लॅन दररोज 5GB डेटा देतो. हे त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांना इंटरनेटचा वेग अधिक हवा असतो. जाणून घ्या BSNLचे वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लॅनबद्दल….

BSNL वर्क फ्रॉम होम STV 599

बीएसएनएलचा विशेष टॅरिफ व्हाऊचर (STV) दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल रोमिंग क्षेत्रासह अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग आणि राष्ट्रीय रोमिंग ऑफर करते. या प्लॅनद्वारे दिवसाला 5GB डेटासह अमर्यादित डेटा दिला जातो. 5GB डेटा संपल्यानंतर वेग 80 Kbps कमी होऊन जातो. या प्लॅनमध्ये एमटीएनएल नेटवर्कसह कोणत्याही नेटवर्कवर दिवसाला १०० मोफत एसएमस करू शकता. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. एसटीवी ५९९ला सीटीओपीयूपी, बीएसएनएलच्या वेबसाईट किंवा सेल्फ-केअर अॅक्टिवेशनच्या माध्यमातून अॅक्टिव्ह करू शकता.

BSNL STV 251 प्लॅन

बीएसएनएल २५१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लॅन देतो. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी 70GB डेटा मिळतो. हा प्लॅन डेटा स्पेसिफिक आहे आणि युजर्सला या प्लॅनसोबत कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ उचलण्यासाठी वेगळा रिचार्ज करावा लागेल. तसेच कंपनी १५१ रुपयांच्या किंमताचा वर्फ फ्रॉम होम प्रीपेड प्लॅनपण देते. ज्यामध्ये ३० दिवसांची व्हॅलिडिटीसाठी 40GB डेटा दिला जातो. हा प्लॅन सर्व रिचार्ज ग्राहकांसाठी पॅन इंडियासाठी लागू आहे. युजर्स बीएसएनएल ऑनलाईन रिचार्ज पोर्टल, माय बीएसएनएल अॅप, रिटेलर आणि इतर थर्ड पार्टी साईटच्या माध्यमातून करू शकतात.


हेही वाचा – दर १० पैकी ६ फ्रंटलाइन वर्कर्सना नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्यास काम गमावण्याची भीती – अहवाल


 

First Published on: January 14, 2022 8:45 PM
Exit mobile version