Faceboookच्या पहिल्या वहिल्या स्मार्टवॉचच्या लाँचिंगचा झाला खुलासा; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

Faceboookच्या पहिल्या वहिल्या स्मार्टवॉचच्या लाँचिंगचा झाला खुलासा; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

Faceboookच्या पहिल्या वहिल्या स्मार्टवॉचच्या लाँचिंगचा झाला खुलासा; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

फेसबुकचे (Facebook) पहिले वहिले स्मार्टवॉच पुढल्या वर्षी जूनपर्यंत लाँच करणार आहे. परंतु लाँचिंगपूर्वी फेसबुकच्या स्मार्टवॉचची चांगलीच चर्चा रंगली आहे. फेसबुकचे स्मार्टवॉच लाँच झाल्यानंतर स्मार्टफोनची गरज भासणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण फेसबुकच्या स्मार्टवॉचमध्ये स्मार्टफोनमधील सर्व फिचर्स उपलब्ध असणार आहे. फेसबुकच्या स्मार्टवॉचमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स पहिल्यांदाच मिळणार आहेत, जे आतापर्यंत कोणत्याही स्मार्टवॉचमध्ये नाही आहेत. यामध्ये कॉलिंगपासून ते कॅमेरा आणि सोशल मीडियाच्या एक्सेसपर्यंत सर्व काही असेल.

फेसबुक स्मार्टवॉचचे फिचर्स

The Vergeच्या वृत्तानुसार, फेसुबक स्मार्टवॉचमध्ये एक युनिक डिस्प्ले दिला जाईल, जो ड्यूल कॅमेरा सेटअपसोबत येईल. हा डिस्प्ले स्मार्टवॉचपासून वेगळेपण केले जाऊ शकते. यामुळे फोटो क्लिक करण्यापासून व्हिडिओ कॅप्चर करण्यापर्यंत मदत होईल. तसेच स्मार्टवॉचमधून तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करू शकता. तसेच स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंगसारखे अनेक हेल्थ फीचर सपोर्ट दिले जातील. स्मार्टवॉचच्या फ्रंटमध्ये एक कॅमेरा असेल, ज्याद्वारे व्हिडिओ कॉलिंग करू शकता. हा कॅमेरा १०८० पिक्सल ऑटो फोकससोबत येईल. स्टेनलेस स्टील फ्रेमसोबत स्मार्टवॉच येईल. हे स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डमध्ये असेल.

फेसबुक स्मार्टवॉचची किंमत

माहितीनुसार, फेसबुक स्मार्टवॉच ४०० डॉलर म्हणजे जवळपास ३० हजार रुपयांत लाँच केले जाईल. दरम्यान फेसबुककडून अद्याप स्मार्टवॉच लाँचिंग आणि त्याच्या नावाचा खुलासा केला नाही आहे. जगभरात सध्या स्मार्टवॉचची जास्त विक्री होत आहे. गेल्या वर्षात ३४ मिलियन स्मार्टवॉचची विक्री अॅपल कंपनीने केली होती.


हेही वाचा – तुमचा स्मार्टफोन कोणत्या Appमुळे होतोय स्लो, कसे घ्यायचे जाणून?


 

First Published on: June 10, 2021 3:25 PM
Exit mobile version