मोबाईलमधून ‘हे’ २३ Apps डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

मोबाईलमधून ‘हे’ २३ Apps डिलीट करा; अन्यथा बँक खाते होईल रिकामे

स्मार्टफोनमधील 'हे' Android apps ठरू शकतात धोकादायक

एखाद्या Android युजर्सच्या मोबाईलमध्ये एक नाहीतर अनेक विविध Appsचा समावेश असतो. मात्र, या Apps च्या माध्यमातून युजर्सची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घटताना दिसत आहेत. त्यामुळे आता Android युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देण्यात आला असून मोबाईलमधील तब्बल २३ Apps हटवण्यास सांगितले आहेत. कारण हे Apps युजर्सच्या नकळत त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करुन खाते रिकामे करु शकतात. त्यामुळे काही Apps डाऊनलोड करताना तुम्हाला देखील सजग राहणे गरजेचे आहे.

सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या संशोधकांनी या खतरनाक Appsबाबत खुलासा केला आहे. अहवालाच्या मते हे सर्व फ्लेसवेअर (fleeceware) Apps आहेत, ज्यांनी गूगल प्ले स्टोअरच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; संशोधक जगदीश चंद्राइहा यांनी एक ब्लॉग पोस्ट करत म्हटले आहे की, गूगलवर मिळालेल्या या Appsच्या अटी आणि त्याचा फॉन्ट खूप छोटा आहे. ज्यामध्ये काही वाचता देखील येत नाही. तसेच त्याच्यात फार कमतरता आहेत. दरम्यान, Sophos च्या संशोधकांनी या २३ Appsची यादी जाहीर केली आहे. हे Apps डाऊनलोड करताना युजर्सनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. या संशोधकांनी फोनमधून हे Apps काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.

com.photoconverter.fileconverter.jpegconverter
com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup
com.screenrecorder.gamerecorder.screenrecording
com.photogridmixer.instagrid
com.compressvideo.videoextractor
com.smartsearch.imagessearch
com.emmcs.wallpapper
com.wallpaper.work.application
com.gametris.wallpaper.application
com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji
com.dev.palmistryastrology
com.video.magiciancom.el2020xstar.xstar
com.dev.furturescopecom.fortunemirror
com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat
com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro
com.nineteen.pokeradar
com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner


हेही वाचा – अवघ्या ५ रुपयांत पेट्रोल-डिझेल शिवाय ‘या’ बाईकने करा, ४५ किमी प्रवास!


First Published on: August 27, 2020 10:15 AM
Exit mobile version