घरदेश-विदेशअवघ्या ५ रुपयांत पेट्रोल-डिझेल शिवाय 'या' बाईकने करा, ४५ किमी प्रवास!

अवघ्या ५ रुपयांत पेट्रोल-डिझेल शिवाय ‘या’ बाईकने करा, ४५ किमी प्रवास!

Subscribe

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी लोकांचे बजेट कोलमडले आहे, त्यादरम्यान, हवा भरून चालणाऱ्या बाईकचा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ही विशिष्ट बाईक हवा भरून धावते. एवढेच नव्हे तर या बाईकमध्ये हवा भरल्यामुळे ४५ किमीचा प्रवास करता येतो, असा दावा केला जात आहे. हवेवर चालणारी ही बाईक स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे डायरेक्टर जनरल (टेक्निकल) भरत राज सिंह यांनी तयार केली आहे. ते लखनौचे रहिवासी आहे.

- Advertisement -

त्याचे म्हणणे आहे की, या बाईकमधील सिलिंडर हवेने भरलेले आहे. सामान्य हवा त्याच्या सिलिंडरमध्ये भरली जाते. या बाईकमध्ये हवा भरण्यासाठी फक्त ५ रुपये खर्च येतो. यामध्ये बाईक ४५ किलोमीटर धावू शकते. त्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी आहे. या नव्या प्रकारे तयार केलेली बाईक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रा. भारत राज सिंह ही या तंत्राविषयी खूप उत्सुक आहे. दुसरीकडे, लोक असेही म्हणतात की, अशी बाईक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान वरदान ठरू शकते.

प्रो. भरत राज सिंह म्हणाले, २००८ मध्ये मी ही बाईक पेटंटसाठी पाठविले होते. या तंत्रज्ञानासाठी १० वर्षांपासून पेटंट केलेले आहे. आता ही बाईक मेक इन इंडिया अंतर्गत येणार असून २२ जून २०१० रोजी अमेरिकेने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे या बाईकला १९२ देशांसमोर सादर केली होती.


परदेशात मागणी असणाऱ्या ‘या’ भाजीची भारतातील किंमत ऐकून व्हाल थक्क!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -