Women’s Day Offer : फक्त १ रुपयात घरी आणा स्कूटी, ११ मार्च पर्यंत ‘या’ कंपनीची ऑफर

Women’s Day Offer : फक्त १ रुपयात घरी आणा स्कूटी, ११ मार्च पर्यंत ‘या’ कंपनीची ऑफर

Women's Day Offer : फक्त १ रुपयात घरी आणा स्कूटी, ११ मार्च पर्यंत 'या' कंपनीची ऑफर

Hero MotoCrop ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा महिला चांगलाच फायदा उचलू शकतात. फक्त एक रुपयाच्या डाऊन पेमेंटसह कंपनीची स्कूटर घरी आणू शकतात. Hero MotoCrop कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही महिलेने कंपनीची स्कूटर खरेदी केल्यास त्यांना ६ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट मिळणार आहे. परंतु महिला दिनानिमित्त कंपनी महिलांना आणखी खास डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

Hero MotoCrop ची प्लेजर प्लस, मेस्ट्रो एज ११० , मेस्ट्रो एज १२५ आणि डेस्टिनी १२५ गाडी खरेदी केल्यास महिलांना ४ हजारापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. इतकेच नाही तर सोबत महिला २ हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी एक्सचेंज बोनसचा देखील लाभ घेऊ शकतात.

Hero MotoCrop कंपनीची महिलांसाठीची खास ऑफर ही काही ठरावीक शहरांसाठी मर्यादीत आहे. तुम्ही तुमच्या नजीकच्या हिरो मोटोकॉर्प डीलरशी याविषयी बोलून माहिती मिळवू शकता. महिला दिनानिमित्त अनेक डिलर्सनी बोनससह १ रुपयांच्या डाऊन पेमेंटवर स्कूटी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Hero MotoCrop ची ही ऑफर केवळ महिला दिना दिवशी नाही तर ११ मार्चपर्यंत असणार आहे. प्लेजर प्लसची किंमत ६२,२२० रुपयांनी सुरू होते. तर मेस्ट्रो एज ११० ६६,८२०, मेस्ट्रो एज १२५ ७३,४५० रुपये तर डेस्टिनी १२५ ही गाडी ७०,४०० रुपयांनी सुरू होते.


हेही वाचा –  RBIची खास सुविधा; आता इंटरनेट आणि स्मार्टफोनशिवाय करता येणार ऑनलाईन पेमेंट

First Published on: March 8, 2022 9:34 PM
Exit mobile version