अनावश्यक ई-मेलमुळे झालायत हैराण, असा करा Gmail ID ब्लॉक

अनावश्यक ई-मेलमुळे झालायत हैराण, असा करा Gmail ID ब्लॉक

Gmail suffers outage in India

बऱ्याचदा अनेक अनावश्यक मेल आपल्या Gmail ID येत असतात. परंतु सतत येणाऱ्या या मेलमुळे खूप वैताग येतो. जर आपणही या अनावश्यक मेलला वैतागला असाल तर तर यापुढे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. कारण आम्ही तुम्हाला अनावश्यक मेल आयडी Gmail वर कसे ब्लॉक करु शकता याची माहिती आम्ही देणार आहोत. एकदा तो आयडी तुम्ही ब्लॉक केलात की या आयडीवरील ई-मेल थेट स्पॅमवर जातील.

Gmail वर ब्लॉक कसे कराल ब्लॉक

१) सर्व प्रथम आपले Gmail Account open करा.

२) आता आपण ब्लॉक करू इच्छित असलेल्या कोणताही ई-मेल आयडी open

३) असे केल्यानंतर आता ई-मेलच्या वरच्या उजव्या बाजूस तुम्हाला तीन डॉट दिसतील. यात आपल्याला बरे पर्याय दिसतील.

४) या पर्यायांमधून आपल्याला Block हा पर्याय निवडावा लागेल. असे केल्यावर तुम्हाला नको असलेला मेल आयडी Block होईल.

५) परंतु या मेल आयडीसा आपणास पून्हा Unblock करायचे असल्यास परत त्याच स्टेप फॉलो करा.

Gmail वर ईमेल शेड्यूल कसे करावे

१) मेल शेड्यूल करण्यासाठी प्रथम कम्पोज ऑप्शनवर जा.

२) त्यानंतर मेलमध्ये सर्व डिटेल्स टाका.

३) सेंड बटणासह ड्रॉप डाऊन बटणावर क्लिक करा.

४) आता शेड्युल सेंड ऑप्शनचा पर्याय निवडा.

५) आता आपण मेल शेड्यूल करण्याची डेट आणि टाईम निवडा आणि शेड्युलवर टॅप करा.


धक्कादायक! जगभरात ३ पैकी १ मृत्यूसाठी ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार- संशोधन


 

First Published on: June 1, 2021 10:05 AM
Exit mobile version