WhatsAppवर ब्लॉक झाल्यानंतरही करून शकता मॅसेज, जाणून घ्या मजेशीर Tricks

WhatsAppवर ब्लॉक झाल्यानंतरही करून शकता मॅसेज, जाणून घ्या मजेशीर Tricks

WhatsApp च्या तीन नव्या फिचर्समुळे चॅटिंग करणं होईल सोप्प, ios सह Android युजर्सही करु शकतात वापर

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Appमध्ये Whatsapp एक आहे. जर तुम्ही Whatsapp युजर असला तर तुम्हाला काही असा ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्ही हैराण व्हाल. Whatsppवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले, तर त्या व्यक्तीसोबत चॅट कसे करणार? असा प्रश्न नक्की पडला असेल. कारण अजूनही असे कोणतेही फिचर आले नाही आहे की, तुम्ही ब्लॉक केलेल्या व्यक्तीशी बोलू शकाल. परंतु काही ट्रिक्स वापरून तुम्ही असे करू शकता. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगणार आहोत.

Whatsapp अकाउंट डिलीट करा

Whatsapp अकाउंट डिलीट करून ते पुन्हा साइन अप करा. यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्या व्यक्तीला मॅसेज करू शकता. जर त्या व्यक्तीने पुन्हा ब्लॉक केले, तर पुन्हा तुम्हाला हिची ट्रिक वापरावी लागले. पण असे करण्यापूर्वी तुम्ही तुमचा डाटा सेव्ह नक्की करा. कारण अकाउंट डिलीट केल्यानंतर तुमचा डाटा गायब होऊ शकतो. त्यामुळे डाटा एक्सपोर्ट करायला विसरू नका.

तिसरी व्यक्तीस ग्रुप तयार करण्यास सांगा

एखाद्या कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीने Whatsappवर ग्रुप करा. त्यामध्ये तुम्ही आणि ब्लॉक केलेल्या व्यक्तीला अॅड करण्यास सांगा. यामुशे ग्रुपच्या माध्यमातून तुमचे बोलणे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. तुम्ही ग्रुपवर जो काही मॅसेज कराल, ते सर्व सदस्यांना दिसतील. जेव्हा तो व्यक्ती ग्रुपवर मॅसेज करेल, ते तुम्हाला दिसेल. पण जर ग्रुप तयार करणारा व्यक्ती लेफ्ट झाला, तर तुम्ही दोनच व्यक्ती सरळसरळ बोलू शकता.

इतर काही टिक्स जाणून घ्या


हेही वाचा – Facebook Trick: फेसुबकवरून तुमचा डाटा होतोय शेअर? तर याला कसे रोखाल?


 

First Published on: June 14, 2021 6:19 PM
Exit mobile version