Huawei Y9s ट्रिपल रियर कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Huawei Y9s ट्रिपल रियर कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Huawei Y9s ट्रिपल रियर कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Huawei Y9s हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्लास बॉडी आणि रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनला सिंगल रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केलं आहे. ग्राहकांना दोन रंगांचे पर्याय मिळतील. याची विक्री केवळ अॅमेझॉनद्वारे होणार आहे. सध्या सरकारी नियमांनुसार डिलिव्हरी फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये करता येत आहे.

सिंगल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी Huawei Y9sची किंमत १९,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना ब्राइडल क्रिस्टल आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांसाठी, त्याची विक्री १९ मे पासून अॅमेझॉनवर सुरू होईल. सध्या वितरण फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये होईल.

Huawei Y9s स्पेसिफिकेशन्स

ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन एंड्रॉइड 9 पाई बेस्ड EMUI 9.1 वर चालतो. यात ६.५९ इंचाचा फुल-एचडी प्लस (१,०८०x२,३४० पिक्सेल) एलसीडी फुलव्यू डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅमसह ऑक्टा-कोर Kirin 710F प्रोसेसर आहे.

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी Huawei Y9s ला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48MPचा आहे, दुसरा कॅमेरा 8MPचा आणि तिसरा कॅमेरा 2MPचा आहे. सेल्फीसाठी 16MPचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.


हेही वाचा – Realme Narzo 10 आणि 10a दमदार बॅटरीसह लाँच


Huawei Y9sची इंटर्नल मेमरी 128GB आहे. कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येऊ शकतं. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, Wi-Fi 802.11b/g/n, 4G LTE, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आलं आहे. Huawei Y9sची बॅटरी 4,000mAh असून 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

 

First Published on: May 13, 2020 3:59 PM
Exit mobile version