घरटेक-वेकRealme Narzo 10 आणि 10a दमदार बॅटरीसह लाँच

Realme Narzo 10 आणि 10a दमदार बॅटरीसह लाँच

Subscribe

रियलमीने स्वस्त किमतीतील दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. बजेटमध्ये असणारे हे फोन तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करु शकता.

स्मार्टफोन निर्माता रियलमीने आणखी एक नवीन स्वस्त किमतीतले स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच केले जाणार होते परंतु कोरोनामुळे ते आज लाँच करण्यात आले आहेत. Realme Narzo 10 आणि Realme Narzo 10a हे दोन स्मार्टफोन लाँच केले गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन 5,000mAh क्षमतेची बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉचसह आहेत. कंपनीने केवळ गेमिंग प्रेमींसाठी हे लाँच केले आहे.

दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. Realme Narzo 10a एकच स्टोरेज पर्याय 3GB RAM + 32GB मध्ये येतो. याची किंमत ८,४९९ रुपये आहे. Narzo 10 देखील एकच स्टोरेज पर्याय 4GB RAM + 128GB मध्ये येतो. याची किंमत ११,९९९ रुपये आहे. Narzo 10 ची प्रथम विक्री १८ मे रोजी होईल, तर Narzo 10a ची विक्री २२ मे रोजी होईल.

- Advertisement -

Realme Narzo 10a फिचर्स

Realme Narzo 10a मध्ये ६.५ इंचाचा डॉट नॉच किंवा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे आस्पेक्ट रेश्यो २०:९ आहे. फोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८९.९ टक्के आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि यूएसबी टाइप ए रिव्हर्स चार्जिंग फीचर आहे.

फोनमध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ट्रिपल कार्ड स्लॉट आहे. यात दोन सिम कार्ड्स आणि मेमरी कार्ड वापरु शकता. फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यात 12MP प्राइमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये 2MP मॅक्रो आणि पोर्ट्रेट सेन्सर आहे. तसंच 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित रिअलमी यूआय वर चालतो. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – १२ मेला लाँच होणार POCO F2 Pro


Realme Narzo 10 फिचर्स

Realme Narzo 10 मध्ये मध्ये ६.५ इंचाचा डॉट नॉच किंवा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे आस्पेक्ट रेश्यो २०:९ आहे. फोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८९.९ टक्के आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि यूएसबी टाइप सी रिव्हर्स चार्जिंग फीचर आहे. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ट्रिपल कार्ड स्लॉट आहे. यात दोन सिम कार्ड्स आणि मेमरी कार्ड वापरु शकता.

फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यात 48MP प्राइमरी सेन्सर आहे. याशिवाय फोनमध्ये 8MPचा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे जो ११९ डिग्री फिल्ड व्ह्यूला सपोर्ट करतो. या व्यतिरिक्त त्यात 2MP चे आणखी दोन सेन्सर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये 16MPचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन Android 10 वर आधारित Realme UI वर चालतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -