Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लाँच; जाणून घ्या फिचर्स

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लाँच; जाणून घ्या फिचर्स

Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर लाँच; जाणून घ्या फिचर्स

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने (Hyundai Motor Company) इलेक्ट्रिक क्रॉसओवर कार Ioniq 5 बाजारात आणली आहे. कंपनीला आशा आहे की ही नवीन कार २०२५ पर्यंत जागतिक इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) उत्पादकांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर येईल. कंपनीचे म्हणणे आहे की ही नवीन कार नवीन इलेक्ट्रिक व्हील प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, जी तिच्या बॅटरी मॉड्यूल तंत्रज्ञानाचा वापर करते.

Ioniq 5 लाँच करण्याचे ह्युंदाईचे दीर्घकालीन उद्दीष्ट म्हणजे २०२५ पर्यंत जागतिक इलेक्ट्रिक वाहन विक्रीत १० टक्के वाटा असावा. इंडस्ट्री ट्रॅकर SNE रिसर्चनुसार, २०२० च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ह्युंदाई आणि किआचा एकत्रित बाजारात हिस्सा ७.२ टक्के होता. ह्युंदाई मोटर आणि त्याची सहयोगी कंपनी किआ कॉर्प (Kia Corp) 2025 मध्ये १० लाख ईव्हीची विक्री करणार आहे.

या नव्या क्रॉसओव्हर मॉडेलमध्ये कंपनीला पॉप अप डोर हँडल्स, रॅक फ्रंट विंडशील्ड, ब्लॅक रूफ, स्लीक एलईडी हेडलॅम्प्ससह 20 इंचाचे अ‍ॅलोय व्हील देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहन म्हणून त्यामध्ये सर्वात मोठ्या आकाराचं चाक दिले जात आहे. नवीन ह्युंदाई Ioniq 5 मध्ये कंपनीने 12 इंचाची टचस्क्रीन सिस्टम दिली आहे आणि स्टीयरिंग व्हीलच्या मागे गिअर सिलेक्टर देण्यात आला आहे.

बॅटरी

ह्युंदाईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कार दोन बॅटरी पॅक, 58 kWh आणि 72.6 kWh क्षमतेसह उपलब्ध असेल. पुढील सहा महिन्यांमध्ये काठी ठिकाणीच उपलब्ध असणार आहे. या इलेक्ट्रिक कारच्या दोन्ही बाजूला चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहे जेणेकरुन कार सहजपणे चार्ज केली जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वेगवान चार्जिंग सिस्टममुळे केवळ १८ मिनिटांत ८० टक्के चार्ज होईल.

Ioniq 5 मध्ये जास्तीत जास्त ड्राईव्हिंग रेंज ४८० किलोमीटर असेल, कोना ईव्हीपेक्षा २० टक्के जास्त. कंपनी वेगवेगळ्या ट्रिममध्ये ती बाजारात आणणार आहे. त्याचा सर्वोच्च वेग ताशी १८५ किलोमीटर आहे.


हेही वाचा – महागड्या पेट्रोल-डिझेल पासून व्हा कायमचे मुक्त, खरेदी करा या ५ इलेक्ट्रिक कार


 

First Published on: February 23, 2021 11:11 PM
Exit mobile version