Lockdown: खुशखबर! एका वर्षात नोकरी गेली तर कंपनी भरणार कारचा ईएमआय!

Lockdown: खुशखबर! एका वर्षात नोकरी गेली तर कंपनी भरणार कारचा ईएमआय!

Lockdown: खुशखबर! एका वर्षात नोकरी गेली तर कंपनी भरणार कारचा ईएमआय!

लॉकडाऊन दरम्यान हुंडई मोटर कंपनीने बुधवारी आपल्या कारची पहिली ऑफर जाहीर केली आहे. त्याअंतर्गत हुंडई मोटर कंपनी काही मॉडेल्सच्या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाचा ईएमआय देणार आहे. यादरम्यान जर ग्राहकांची नोकरी गेली तर कंपनी तीन महिन्यांकरिता ईएमआय भरणार असल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात हुंडई मोटर कंपनीची कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ही ऑफर मिळणार आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही ऑफर हुंडईच्या नवीन ग्राहकांसाठी आहे. कार खरेदीच्या तारखेपासून एक वर्षासाठी ईएमआय असणार आहे. पण जर ग्राहकांची एका वर्षात नोकरी कोणत्याही कारणास्तव गेली तर त्यांची तीन महिन्यांच्या ईएमआयमधून सुटका होणार आहे.

संचालक तरुण गर्ग म्हणाले की, ग्राहकांना मानसिक शांतता देण्यासाठी ही कल्पना केली आहे. आम्ही ग्राहकांची कार खरेदी करण्याची इच्छा समजू शकतो आणि अशा परिस्थिती कार खरेदी करणे कठीण होऊ नये यासाठी हुंडईने ही अनोखी ऑफरी ठेवली आहे.

लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये वाहन विक्री ठप्प झाली. यादरम्यान कंपन्यांनी एकही कार विकली नाही. पूर्ण महिना कार शोरून बंद होते. हुंडईसह इतर कंपन्या आता ऑनलाईन विक्रीला सुरुवात करीत आहेत. लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये ब्रिटनमधील वाहन विक्रीत ९७ टक्के घट झाली, तर अमेरिकेतही ५० टक्के घट झाली.


हेही वाचा – शाओमी, रिअलमी, सॅमसंग, विवो या स्मार्टफोन फोन कंपनीने घरपोच डिलिव्हरी केली सुरू


 

First Published on: May 6, 2020 8:59 PM
Exit mobile version