असे आले पृथ्वीवर पाणी ?

असे आले पृथ्वीवर पाणी ?

अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहाचा प्रातिनिधीक फोटो

सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्यावर पाणी आहे. पण पृथ्वीवर पाणी का? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर जपानचे उपग्रह अकारी (AKARI)ने शोधून काढले आहे. अंतराळात असलेल्या १७ लघुग्रहांवर पाणी आढळले असून त्यांनीच हे पाणी पृथ्वीवर आणले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या नव्या शोधामुळे पृथ्वीवरच पाणी का? या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळू शकणार आहे.

लघुग्रहावंर आहे पाणी

जपानने केलेल्या अभ्यासानुसार या लघुग्रहांवर पाणी आढळून आले आहे. हा लघुग्रह दगड असून या दगडांवरील केमिकल रिअॅक्शनमुळे त्यावर पाणी तयार होत आहे. त्यामुळे या लघुग्रहावर पाणी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अंतराळात हे लघुग्रह फिरत असतात. त्यांनी पाण्याचे आदान-प्रदान या सूर्यमालेत केले असावे असा अंदाज जपानच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे. ज्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर या लघग्रहावर असलेले पाणी हे गोठलेल्या म्हणजेच बर्फाच्या स्वरुपात आहे.

अंतराळातून टिपला इनसाईट यानाचा फोटो

लघुग्रह पुरवतोय पाणी

अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहांपैकी १७ लघुग्रहांवर पाणी सापडले आहे. सध्य स्थितील १७ लघुग्रहांवर हे पाणी आढळले असून त्यांनीच पृथ्वीवर पाणी दिले असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सध्या अंतराळ संशोधनात इतर ग्रहावंरील शोधही सुरु आहेत. यामध्ये मंगळ आणि चंद्रावरही पाणी आढळले आहे. तर नासाने केलेल्या संशोधनात शनी ग्रहावरही पाणी आढळले आहे. पाणी इतर ग्रहांवर इतर स्वरुपात आहेत. पण पृथ्वीवरच पाणी सर्वाधिक पाणी याचा शोध सुरुच आहे. या नव्या शोधामुळे याला एक वेगळी दिशा मिळेल.

अंतराळयानाला पडले ‘छिद्र’, अंतराळातच केली दुरुस्ती

जपानची मोहीम

जपान अंतराळ संशोधन केंद्राने फेब्रुवारी २००६ मध्ये AKARI उपग्रह अंतराळात सोडला. २०११ साली ही मोहीम संपली. या यानावर लावण्यात आलेल्या कॅमेराने ही सगळी माहिती जमवली असून अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहांवर हे पाणी आढळून आले आहे.

First Published on: December 21, 2018 12:15 PM
Exit mobile version