व्हॉट्सअॅप झाले डाऊन; एकदा प्रायव्हसी चेंज तर करुन पहा

व्हॉट्सअॅप झाले डाऊन; एकदा प्रायव्हसी चेंज तर करुन पहा

व्हॉट्सअॅप झाले डाऊन; एकदा प्रॉव्हसी चेंज तर करुन पहा

व्हॉट्सअॅप या मेसेजिंग मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर जगभरात कोट्यवधी लोकं करत आहेत. त्यामुळे जगभरात व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप बनलं आहे. त्यामुळे सातत्याने युजर्सकडून या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो. मात्र, काही तासांपासून या व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनमुळे युजर्स त्रस्त झाले आहेत. कारण गेल्या दोन तासांपासून व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनची प्रायव्हसी चेंज होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संतापलेल्या युजर्सने ट्विट करत याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

भारतात आज, शुक्रवारी रात्री ८.३९ मिनिटांनी व्हॉट्सअॅपला प्रोब्लेम येण्यास सुरुवात झाली होती. याबाबत तब्बल २ हजार २०० युजर्सने व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटला रिपोर्ट दिला होता. त्यानंतर अनेक युजर्सने प्रत्यक्षात प्रायव्हसी सेटिंग चेंज करुन पाहिल्यानंतर जो प्रोब्लेम येत होता. त्याचा स्क्रिनशॉट काढून ट्विट केले. त्यानंतर हा प्रोब्लेम सर्वच अॅन्ड्रॉईड आणि अॅपलच्या मोबाईला येत असल्याचे समोर आले. त्यानंतर बऱ्याच युजर्सने त्याचे स्क्रिनशॉट काढत ट्विट केले.

मिळालेल्या माहितीनुसार; ६४ टक्के युजर्सना लास्ट सिन चेंज करण्यात प्रोब्लेम येऊ लागला आहे. तर २६ टक्के लोकांना व्हॉट्सअॅप कनेक्टेड होण्यास प्रोब्लेम येत आहे. तर ८ टक्के लोकांना व्हॉट्सअॅप लॉगइनलाच प्रोब्लेम येत असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे हा व्हॉट्सअॅपचा प्रोब्लेम केवळ भारतातील लोकांनाच नाहीतर युरोप, मेक्सिको याठिकाणी राहणाऱ्या युजर्सना देखील येत आहे.


हेही वाचा – चीनी बहिष्काराचा ट्रेंड भारतात टॉपला; दुसरीकडे चीनी मोबाईल आऊट ऑफ स्टॉक!


 

First Published on: June 19, 2020 11:19 PM
Exit mobile version