PSLV-C42 चे यशस्वी प्रक्षेपण

PSLV-C42 चे यशस्वी प्रक्षेपण

PSLV- C42 (सौजन्य- मनोरमा ऑनलाईन)

इस्रोकडून PSLV-C42चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर, रविवारी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी हे उपग्रह सोडण्यात आले.बंगळुरुच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. PSLV-C42 मध्ये भारताचा कोणताही उपग्रह नाही. हे उड्डाण पूर्णत: व्यावसायिक असले तरी हे उपग्रह पृथ्वीचा अधिक अभ्यास करणार आहे.

काय अभ्यासणार हे उपग्रह?

PSLV-C42 मध्ये ब्रिटन बनावटीचे दोन उपग्रह आहेत नोवाएसएआर आणि एस १-४ या उपग्रहांचा समावेश आहे. नोवाएसएआर पृथ्वीवरील जीवसृष्टीचे चित्रण करणार आहेत. शिवाय भू गर्भ आणि पृथ्वीवरील बर्फाचा अभ्यास करणार आहे. तर एस १-४ पर्यावरणाचा सखोल अभ्यास करणार आहे. या आधी सहा महिन्यापूर्वी आईएनआरएसएस-१ आय नौवहन उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी वाचा- PSLV C- 42च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज

ऑक्टोबरमध्येही होणार उड्डाणे

बहुप्रतिक्षित GSLV MARK -3 D-2 आणि GSAT-29 या उपग्रहाचे उड्डाण होणार आहे. ही चंद्रयान मोहिम असून भारतीय अंतराळ संशोधनासाठी एक महत्वपूर्ण उड्डाण असणार आहे. या उड्डाणाची तारीख अजून ठरली नसली तरी हे उड्डाण ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


(सौजन्य-ANI)

गायडेड मिसाईलची यशस्वी चाचणी

PSLV-C42 चे यशस्वी उड्डाण झाले ही आनंदाची बातमी होतीच. तर दुसरीकडे स्वदेशी बनावटीची पोर्टेबल एंटी- टँक गाईडेड मिसाईलची देखील रविवारी चाचणी करण्यात आली. अहमदनगरमध्ये ही दुसरी यशस्वी चाचणी करण्यात आली.

First Published on: September 17, 2018 12:27 PM
Exit mobile version