LICची खास पॉलिसी, २८ रुपयांमध्ये मिळणार २ लाखांचा फायदा

LICची खास पॉलिसी, २८ रुपयांमध्ये मिळणार २ लाखांचा फायदा

LICची खास पॉलिसी, २८ रुपयांमध्ये मिळणार २ लाखांचा फायदा

कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी LICने खास पॉलिसी आणली आहे. LIC मायक्रो बचत विमा पॉलिसी असे या पॉलिसीचे नाव आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही पॉलिसी खूप फायदेशीर आहे. ही पॉलिसीमुळे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देते. त्याचप्रमाणे पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्याची एकरकमी रक्कम दिली जाईल. या विमा योजनेत ५० ते २ लाखांचा विमा उपलब्ध आहे. ही एक नॉन लिंक्ड विमा योजना आहे. जर एखाद्याने ३ वर्षासाठी प्रीमियम भरला असले तर त्याला मायक्रो बचन प्लॉन मधून लोन घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या पॉलिसीचा फायदा मिळवण्यासाठी केवळ २८ रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. ही पॉलिसी कोण घेऊ शकतो? पॉलिसीची काय वैशिष्ट्ये आहेत? जाणून घ्या. (LIC micro insurance, you will get a benefit of Rs 2 lakh for Rs 28)

LICचा हा नवीन प्लॉन १८ ते ५५ वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. या पॉलिसीसाठी कोणत्याही मेडिकल तपासणीची गरज नाहीये. मायक्रो बचत विमा पॉलिसीची मुदत १० ते १५ वर्षांपर्यंत असेल. या पॉलिसीत तुम्ही वार्षिक, अर्धवार्षिक,तिमाही आणि महिन्याच्या तत्त्वावर पैसे जमा करु शकता. याच पॉलिसीत LIC एक्सिडेंट राइडर सुविधा देखिल घेता येऊ शकते. मात्र त्यासाठी वेगळा प्रीमियम भरावा लागतो.

एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३५व्या वर्षी १५ वर्षांची पॉलिसी घेतली तर त्याला ५२.२० रुपये प्रीमियम भरावा लागेल. याचप्रमाणे जर कोणी २ लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर त्याला ५२.२० x १०० x २ म्हणजेच १० हजार ३०० रुपये वर्षाला भरावे लागतील. म्हणजेच दररोज २८ रुपये प्रीमियम आणि महिन्याला ८४० रुपये प्रीमियम भरावा लागेल. दररोज २८ रुपयांनी २ लाखांची पॉलिसी मिळणार. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती १५ वर्षांचा प्लॅन घेत असेल तर त्याला प्रति हजार ५१.५ रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर २५ वर्षांच्या व्यक्तीला याच कालवीसाठी ५१.६० रुपये आणि ३५ वर्षांच्या व्यक्तीला ५२.२० रुपये प्रीमियम प्रति हजार रुपये द्यावा लागेल. १० वर्षांच्या या प्लॅनमध्ये ८५.४५ ते ९१.९ रुपये प्रति हजार रुपये असतील तसेच प्रीमियममध्ये २ टक्के सूटही देण्यात येणार आहे. पॉलिसी खरेदी केल्यानंतर जर ती तुम्हाला आवडली नाही तर ती १५ दिवसांच्या आत सेरेंडरही करु शकता.


हेही वाचा – आता यूट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांना भरावा लागणार टॅक्स, जाणून घ्या नियम

 

 

First Published on: June 2, 2021 4:11 PM
Exit mobile version