घरटेक-वेकआता यूट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांना भरावा लागणार टॅक्स, जाणून घ्या नियम

आता यूट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांना भरावा लागणार टॅक्स, जाणून घ्या नियम

Subscribe

सध्या कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. पण काही मंडळींनी नवा मार्ग निवडला आहे, तो म्हणजे युट्यूबवर व्लॉग (vlog) करून कमाई करण्याचा. पण आता यूट्यूबद्वारे कमाई करणाऱ्यासाठी एक वाईट बातमी आहे. १ जून म्हणजे आजपासून पूर्ण कमाई युट्यूबर्सच्या खिशात जाणार नाही आहे. कारण आता युट्यूबर्सला मिळवणाऱ्या उत्पन्नावर कर म्हणजेच टॅक्स भरावा लागणार आहे. पण अमेरिकेतल्या कंटेंट क्रिएटर्सना हा टॅक्स भरावा लागणार नाही आहे. फक्त भारतासह संपूर्ण जगातील देशांमधील युट्यूबर्ससोबत कंटेंट क्रिएटर्सना टॅक्स भरावा लागणार आहे.

जगातील सर्व देशांप्रमाणे भारतात देखील लाखो यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स आहेत, जे यूट्यूबद्वारे खूप चांगले कमवतात. कोरोना काळात घरी बसून अनेक लोकांनी आपल्या कल्पकतेने वेगवेगळे व्हिडिओ तयार करून यूट्यूबवर अपलोड करून कमाई केली आहे. १ जूनपूर्वी संपूर्ण उत्पन्न यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्सच्या खिशात जात होते, परंतु आता तसे होणार नाही आहे. आता त्यांना यापैकी काही टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर जे लोकं पूर्णपणे यूट्यूबच्या कमाईवर अवलंबून आहेत आणि पूर्णवेळ यूट्यूबसाठी काम करतात, त्यांना याचा जोरदार झटका लागणार आहे.

- Advertisement -

दिलासादायक बाब म्हणजे यूट्यूबर्स किंवा कंटेंट क्रिएटर्सच्या व्ह्यूजवर टॅक्स लावला जाईल, जो अमेरिकीन व्ह्यूअर्सकडून मिळेल. जर कोणाच्या व्हिडिओ भारतात जास्त पाहिला जात आहे आणि अमेरिकेमध्ये कमी तर अशा लोकांना खूप कमी टॅक्स भरावा लागेल.

१ जूनपासून भारतीय यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स टॅक्स जाळ्यात अडकले जाणार आहेत. त्यांना आपल्या कमाईतून २४ टक्के दर महिन्याच्या हिशोबानुसार टॅक्स द्यावा लागेल. तसेच ज्या लोकांनी आपल्या कमाईबाबतची माहिती ३१ मेपूर्वी दिली आहे, अशा यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना १५ टक्क्यांच्या हिशोबाने टॅक्स भरावा लागेल. परंतु ज्या लोकांना ३१ मेपर्यंत कमाईची माहिती दिली नसेल, तर त्या व्यक्तीवर किंवा कंपनीवर २५ टक्क्यांच्या हिशोबाने टॅक्स लावला जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – अनावश्यक ई-मेलमुळे झालायत हैराण, असा करा Gmail ID ब्लॉक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -