Voice Control Smart TV: विना रिमोट फक्त तुमच्या आवाजाने कंट्रोल होणारी ‘ही’ Smart TV

Voice Control Smart TV: विना रिमोट फक्त तुमच्या आवाजाने कंट्रोल होणारी ‘ही’  Smart TV

Voice Control Smart TV: विना रिमोट फक्त तुमच्या आवाजाने कंट्रोल होणारी 'ही' Smart TV

सध्या कोरोनामुळे लोकं घरात असल्याने टीव्ही आणि मोबाईलाचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाईलमध्ये अनेक नवनवीन फिचर्स येत आहेत. दरम्यान घरात बसून कंटाळा आला असेल तर चित्रपट आणि व्हिडिओ पाहण्याची मज्जा घेण्यासाठी स्मार्ट टीव्ही (Smart TV) आले आहेत. ज्यामध्ये यूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, डिज्नी+हॉटस्टारसारखे ५ हजारहून अधिक Apps आहेत. हे स्मार्ट टीव्ही फक्त तुमच्या आवाजाने ऑपरेट करू शकता. म्हणजेच तुम्ही फक्त बोलून कंट्रोल करू शकता.

या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्शनसाठी HDMI आणि USB पोर्ट्स व्यतिरिक्त eARC HDMI पोर्ट, ब्लूटूथ ५.० आणि ऑप्टिकल असतात. तुम्ही अशा टीव्हींना सेट टॉप बॉक्ससोबत लॅपटॉप, प्रोजेक्टर, गेमिंग कंसोल, ब्लू रे प्लेयर्स, हार्ड ड्रायव्ह आणि USB डिव्हाइस कनेक्ट करू शकता. या व्हाईस कंट्रोल स्मार्ट टीव्हीचा आवाज इतका दमदार असतो की, तुम्हाला चित्रपट आणि व्हिडिओ पाहताना दुप्पट मज्जा येते.

या स्मार्ट टीव्हीची जाणून घ्या किंमत

या व्हाईस कंट्रोल स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी HDML पोर्ट्स, 2 USB पोर्ट्स, ALLM, eARC HDMI पोर्ट, ब्लूटूथ 5.0 आणि ऑप्टिकल आहे. अँड्रॉईड टीव्ही १०, पेरेंटल लॉक, स्मार्ट क्युरेशन, युनिव्हर्सल सर्च, लँग्वेज युनिवर्स, ओके गूगल, क्रोमकास्टसारख्या स्मार्ट टीव्ही फिचर्स आहेत. तसेच नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, डिज्नी+हॉटस्टारसारखे Apps सपोर्ट करते. शिवाय 4K LED पॅनल, डॉल्बी, व्हिजन, रिअॅलिटी फ्लो, विविड पिक्चर इंजन सारखे डिस्प्ले आहेत.


हेही वाचा – तुमचा स्मार्टफोन कोणत्या Appमुळे होतोय स्लो, कसे घ्यायचे जाणून?


 

First Published on: June 7, 2021 2:33 PM
Exit mobile version