MTNLचा ३९९ रुपयांचा प्री-पेड प्लॅन लाँच, मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

MTNLचा ३९९ रुपयांचा प्री-पेड प्लॅन लाँच, मिळेल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा

MTNL: ९ वर्षांमध्ये ७.५८ लाख मुंबईकरांचा MTNL लँडलाईन सेवेला रामराम

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड एमटीएनएल (MTNL)ने आपल्या युजर्ससाठी नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत ३९९ रुपये आहे. या योजनेत ग्राहकांना १०० एसएमएससह डेटा सुविधा मिळेल. याशिवाय सरकारी टेलिकॉम कंपनीने १ हजार २९८ आणि १ हजार ४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. या दोन्ही प्लॅन जुलैमध्ये बंद करण्यात आले होते. पण आता युजर्ससाठी ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जाणून घ्या एमटीएनएल ३९९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये एमटीएनएल युजर्सना दररोज 500MB डेटासह १०० एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅनद्वारे युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. पण या प्लॅनमध्ये युजर्सना प्रीमियम Appचे सब्सक्रिप्शन दिले गेले नाही. या पॅकची वैधता २८ दिवस आहे. सध्या हा प्लॅन मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी लवकरच हा प्लॅन देशातील अन्य टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध करेल.

एमटीएनएलचा १ हजार २९८ रुपयांचा प्लॅन

एमटीएनएलची हा प्लॅनमध्ये फक्त डेटा पॅक आहे. युजर्सना या प्लॅनमध्य दररोज 2GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा दिली गेली नाही. या प्लॅनची मुदत २७० दिवस आहे.

एमटीएनएलचा १ हजार ४९९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये दररोज 2GB डाटा मिळले. तसेच युजर्सना होम नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकेल. सध्या या प्लॅनमध्ये युजर्सना रोमिंग चार्ज द्यावे लागेल. या प्लॅनची मुदत ३६५ दिवस आहे.


हेही वाचा – जगातील सर्वात स्वस्त Made in India इलेक्ट्रिक स्कूटर; मायलेज फक्त २०…


 

First Published on: August 17, 2020 5:23 PM
Exit mobile version