घरबसल्या पाच हजारात बुक करा Mahindra XUV500 आणि स्कॉर्पियो

घरबसल्या पाच हजारात बुक करा Mahindra XUV500 आणि स्कॉर्पियो

देशातील नामांकित ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने BS6 2020 Mahindra XUV500 आणि Mahindra XUV500 BS6 या गाड्यांची ऑनलाईन बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे. कंपनीने अलीकडेच या दोन्ही एसयूव्ही आपल्या अधिकृत वेबसाइटवर सादर केल्या असून लवकरच या दोन्ही एसयूव्ही बाजारात आणल्या जातील. लॉकडाऊन संपल्यानंतर दोन्ही एसयूव्ही बाजारात आणल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या फक्त ५००० रुपये टोकन रक्कम देऊन ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.

BS6 Mahindra XUV500

पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, BS6 Mahindra XUV500 मध्ये नवीन २.२ लीटर mHawk BS6 इंजिन असेल जे 3750 Rpm वर 153 Bhp आणि 1750-2800 Rpm वर 360 Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनच्या बाबतीत, हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्सच्या पर्यायात येईल. सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत Mahindra XUV500 मध्ये ड्युअल एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, ईएसपी, रोल मिटिगेशन, हिल होल्ड, हिल डिसेंट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये आहेत.


हेही वाचा – ना नोकऱ्या जाणार, ना पगारात कपात होणार; या दिग्गज कंपन्यांचं आश्वासन


BS6 Mahindra Scorpio

पॉवर आणि स्पेसिफिकेशनच्या बाबतीत महिंद्रा स्कॉर्पिओ बीएस 6 मध्ये mHAWK इंजिन दिलं आहे. जे 140 Bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करेल. ट्रान्समिशनच्या बाबतीत, या एसयूव्हीचे इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचं झालं तर BS6 Mahindra Scorpioमध्ये अद्ययावत जनरेशन ब्रेकिंग सिस्टम आहे. सुरक्षेच्या बाबतीत, BS6 Mahindra Scorpioमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग, साइड इन्स्ट्रुमेंट बीम, क्रॅश प्रोटेक्शन, क्रंपल झोन, इंजिन इंजिन इमोबिलायझर, पॅनीक ब्रेक इंडिकेशन, इमर्जन्सी कॉल (ई-कॉल), प्रगत स्टॅटिक बेंडिंग टेक्नॉलॉजी, ४ व्हील ड्राइव्ह, इंटेलिपार्क, टायर-ट्रोनिक, मायक्रो हायडब्रिड तंत्रज्ञान, रेन आणि लाईट सेन्सर, ड्रायव्हर माहिती प्रणाली आदी वैशिष्ट्ये आहेत.

 

First Published on: April 27, 2020 6:10 PM
Exit mobile version