घरCORONA UPDATEना नोकऱ्या जाणार, ना पगारात कपात होणार; या दिग्गज कंपन्यांचं आश्वासन

ना नोकऱ्या जाणार, ना पगारात कपात होणार; या दिग्गज कंपन्यांचं आश्वासन

Subscribe

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे, परंतु आमच्या कर्मचार्‍यांना घाबरण्याचं कारण नाही. त्यांची नोकरी आणि पगार सुरक्षित आहेत, असं आश्वासन या कंपन्यांनी दिलं.

वाहन कंपन्यांच्या कर्मचार्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्कोडा-फोक्सवॅगन आणि रेनॉल्ट आणि चीनी कंपनी एमजी मोटर या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कपात होणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. यासह कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार नाही, असं देखील या कंपन्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे, परंतु आमच्या कर्मचार्‍यांना घाबरण्याचं कारण नाही. त्यांची नोकरी आणि पगार सुरक्षित आहेत.

स्कोडा-फोक्सवैगन कंपनीनं म्हटलं आहे की, आम्ही भारतातही काम करत राहू. या कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. यासह भारतात इतरही अनेक उत्पादने बाजारात आणणार असल्याचं सांगितलं. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना बोनसही देणार असल्याचं सांगितलं. तथापि, कंपनीने म्हटलं आहे की वार्षिक बोनससाठी व्यवसाय सामान्य होईपर्यंत कर्मचार्‍यांना प्रतीक्षा करावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता – राजेश टोपे


स्कोडा फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपाराय म्हणाले की, कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या व पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. ते म्हणाले की आम्ही यापूर्वीही आमच्या कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकलं जाणार नाही आणि वेतनात कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. गेल्या वर्षीचा बोनसही आम्ही देऊ, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटरामन ममीलपल्ले म्हणाले की, सध्याचे संकट पाहता कर्मचारी गेल्या महिन्यापासून घाबरून गेले आहेत आणि त्यांना पगार कपात आणि नोकरी जाण्याची भीती आहे. परंतु आम्ही त्यांना आधीच खात्री करुन दिली होती की त्यांची नोकरी आणि पगार दोन्ही सुरक्षित आहेत. त्याचबरोबर एमजी मोटरने आपल्या डीलर्स आणि कर्मचार्‍यांनाही पगार आणि नोकरी सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष राजीव चाबा म्हणाले की, आम्ही वचन दिलं आहे की २०२० च्या सर्वात वाईट परिस्थितीतही नोकऱ्या कमी करणार नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -