वायरलेस चार्जर घेण्याआधी ‘हे’ लक्षात ठेवा…

वायरलेस चार्जर घेण्याआधी ‘हे’ लक्षात ठेवा…

प्रातिनिधिक फोटो

‘वायरेलस’ स्पीकर्स, हेडफोन्सप्रमाणेच वायरलेस चार्जरही सध्या ट्रेंडमध्ये आहेत. विशेषत: तरूण वर्गामध्ये वायरलेस चार्जिंगची जास्त क्रेझ आहे. कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कुठे गेल्यावर वापरायला सोपे जावेत यासाठी युजर्स वायरलेस चार्जरला अधिक पंसती देतात. याचा उपयोग करुन तुम्ही बसल्याजागी किंवा तुम्हाला हवं असेल तिथे तुमचा स्मार्टफोन चार्ज करु शकता. मात्र, अत्यंत फायदेशीर असलेल्या या वायरलेस चार्जरविषयी लोकांमध्ये अनेक शंका उपस्थित होतात. उदागरणार्थ चार्जरची क्वॉलिटी, चार्जर ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीबद्दलची विश्वासार्हता तसंच चार्जरच्या जास्त वोल्टेजमुळे फोनचं नुकसान होणर नाही ना? असे अनेक प्रश्न युजर्सच्या मनात येतात. तुम्हीसुद्धा वायरलेस चार्जर खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर खालील गोष्टींकडे काना-डोळा करु नका. या टीप्स तुम्हाला वायरलेस चार्जर खरेदी करण्यासाठी नक्की मदत करतील.

ही काळजी घ्या…

  • कायम ब्रँडेड चार्जरलाच प्राधान्य द्या. काही पैसे वाचवण्याच्या नादात तुमच्या महागड्या स्मार्ट फोनचं नुकसान होणार नाही ना? याची काळजी घ्या
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब असल्यास करंट लागणे, त्या वस्तू फुटणे या गोष्टी घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ब्रँडेड चार्जर घेण्याकडेच कल ठेवा
  • वायरलेस चार्जर घेताना चार्जरचे पावर आउटपुट बघा. 10W च्या चार्जरमुळे तुमचा फोन कमी वेळात पूर्ण चार्ज होईल. याउलट 5W चे चार्जर किमतीने कमी असतील मात्र तुमचा फोन चार्ज करण्यासाठी ते वेळही अधिक घेतील
  • चार्जिंग पॅडचे व्हॉल्ट चेक करा. फोनचे चार्जर 10W चे असल्यास चार्जिंग पॅड तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त व्हॉल्टचे असायला हवे
  • वायरलेस चार्जर अँड्रॉईड आणि  iOS दोन्ही फोनच्या चार्जिंगसाठी वेगवेगळा वेग देतो. त्यामुळे तुमच्या फोनचा चार्जिंग स्पीड चेक करा. वायरलेस चार्जरचा स्पीड आणि तुमच्या फोनचा चार्जिंग स्पीड मॅच झाल्यावरच तो चार्जर खरेदी करा

वाचा : नव्या वर्षात स्वस्त झाल्या या इलेक्ट्रॉनिक वस्तू

First Published on: January 6, 2019 3:29 PM
Exit mobile version