One Plus 6T Launch in India : वन प्लस जिंकायचाय? मग खेळा

One Plus 6T Launch in India : वन प्लस जिंकायचाय? मग खेळा

मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी OnePlus 6T लवकरच भारतात लाँच होणार आहे. वन प्लसच्या ऑफिशीयल ट्विटर हँडलवर लाँचिंग इव्हेंटची तारिख रिलीज केली असून २९ ऑक्टोबर रोजी वन प्लस अमेरिकेत लाँच होणार आहे. याआधी ३० ऑक्टोबर रोजी लाँचिंग होणार होते, मात्र अॅपल कंपनीसोबत क्लॅश होत असल्यामुळे एक दिवस आधीच आपला मोबाईल लाँच करण्याचा निर्णय वन प्लसने घेतलेला आहे. मात्र तरिही भारतात हा मोबाईल ३० ऑक्टोबर रोजीच लाँच केला जाणार आहे.

कंपनीचे सीईओ पीट लाऊने यांनी एक पत्रक लिहून सांगितले की, ३० ऑक्टोबरचा कार्यक्रम आम्ही एक दिवस आधीच घेत आहोत. अॅपलच्या इव्हेंटसोबत धडक होऊ नये आणि आमच्या प्रोडक्ट लाँचिंगला बातम्यांचे चांगले कव्हरेज मिळण्यासाठी तारखेत बदल करण्यात आला आहे. तत्पुर्वी लाँचिंग इव्हेंटसाठी ज्या ज्या लोकांनी तिकिट बुक केले होते, त्यांना रिफंड द्यायला सुरुवात केली आहे. तसेच ज्या ग्राहकांनी इव्हेंटला येण्यासाठी प्लाईट आणि हॉटेल बुक केले होते, त्याचेही पैसे कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे, पीट लाउ यांनी सांगितले.

हे वाचा – OnePlus कंपनीचा ‘स्मार्ट टीव्ही’ लवकरच

अमेरिकेसाठी जरी तारखेत बदल करण्यात आला असला तरी भारतात मात्र ठरलेल्या वेळेतच मोबाईल लाँच केला जाईल. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्पलेक्समध्ये उदघटनाचा सोहळा रंगणार आहे. भारतात वनप्लसला चांगले मार्केट आहे. अनेक भारतीय या फोनचे चाहते असून भारताच्या लाँचिंगवर सर्वांचीच नजर असणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी कंपनीने प्री ऑर्डर बुकिंग सुरु केली आहे. अॅमेझॉन अॅपवर जर हा मोबाईल घेणार असाल तर तुम्हाला घसघशीत सुट मिळेल. प्री बुकिंग करणाऱ्यांसाठी टाइप सी इयरफोन आणि अॅमेझॉन अॅपवर ५०० रुपयांचे गिफ्ट वाऊचर मिळणार आहे.

क्विज खेळा फोन जिंका

वन प्लस कंपनी नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे वापरते. यावेळीही प्रमोशनसाठी त्यांनी एका क्विजची घोषणा केली आहे. या क्विजमध्ये जिंकणाऱ्या खेळाडूला वन प्लस ६ टी मोफत दिला जाणार आहे. Unlock Your Speed या नावाने हे क्विज खेळले जात आहे. इच्छूकांनी कंपनीच्या unlock.oneplus.com या वेबसाइटवर जावे. तिथे Tap Your Screen वर क्लिक करुन क्विजची सुरुवात करायची आहे.

हे वाचा – अबब! या चोरांनी पळवले ११० मोबाईल

First Published on: October 21, 2018 5:24 PM
Exit mobile version