घरमहाराष्ट्रअबब! या चोरांनी पळवले ११० मोबाईल

अबब! या चोरांनी पळवले ११० मोबाईल

Subscribe

मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी केला पर्दाफाश

बेसावध व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे एकून ११० मोबाईल आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन आरोपीला अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीची पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

लखन अवधूत शर्मा (१८), लहू अंकुश भिसे (१८) दोघेही चिंचवडच्या दळवी नगर झोपडपट्टीत राहतात. हे दोघे मोबाईल चोरून ते कमी किंमतीत विकायचे. आरोपी लखन आणि लहू हे दोघे जण आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि निगडी परिसरात मोबाईल चोरी करायचे. बेसावध असलेल्या व्यक्तीचा ते मोबाईल हिसकाहून दुचाकीवर पळ काढत. आणि हेच मोबाईल कमी किंमतीत विकायचे. हे त्यांचे नित्याचे काम होते. या दोघांनाही चिंचवड पोलिसांनी अटक केली असून हे मुख्य आरोपी आहेत.

- Advertisement -

चिंचवडच्या बिजालिनगर येथे दोन मोबाईल चोर असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या टीमने तातडीने जाऊन सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मोबाईल चोरीच्या घटनेत एका अल्पवयीन आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले.आरोपी लखनची आई मंगल शर्मा या चोरीचे मोबाईल घरात असल्याचे माहीत असताना पोलिसांना न सांगता त्या आरोपी मुलाला मदत करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -