भारतात आज ‘वनप्लस ८ सीरिज’ लाँच होणार; जाणून घ्या फिचर्स

भारतात आज ‘वनप्लस ८ सीरिज’ लाँच होणार; जाणून घ्या फिचर्स

चीनची वनप्लस स्मार्टफोन कंपनी वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन आज लाँच करणार आहे. या फोनची बरीच माहिती लाँच होण्याआधी लीक झाली आहे. ज्यामध्ये संभावित किंमत आणि काही फीचर्सची माहिती उघड झाली होती. वनप्लस ८ सीरिजमध्ये लॅटेस्ट प्रोसेसर आणि उत्कृष्ट असा कॅमेरा असणार आहे. कंपनी आज वनप्लस ८ च्या ५ जी व्हेरियंटचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. यासह कंपनी OnePlus Bullets Wireless Z इयरबड्स सुद्धा लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेट लॉ यांनी ट्विटरवर एका पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये वनप्लस 8 प्रोच्या अल्ट्रा-वाइड कॅमेर्‍याबद्दलही माहिती दिली आहे. भारतात आज रात्री ८.३० वाजता वनप्लस ८ सीरिजचं लाँचिंग होणार आहे. हे लाँचिंग कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. या सीरिजच्या स्मार्टफोनची खरी किंमत आणि या फोनची खास वैशिष्ट्ये लाँचिंगनंतर स्पष्ट होणार आहे.


हेही वाचा – स्वस्त iPhone १५ एप्रिलला लाँच होणार; जाणून घ्या किंमत

वनप्लस ८ प्रोमध्ये ३० वॅट फास्ट चार्जिंग आणि वॉर्प चार्ज ३० वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी, तर वनप्लस ८ मध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. हा फोन किती रॅम आणि इंटर्नल स्टोरेजचा असेल याबाबतची माहिती समोर आली नाही. मात्र, वनप्लस ८ प्रो हा ८ जीबी आणि १२८ जीबी तसंच १२ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज या पर्यायात असूण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड व्हर्जन १० ओएस असेल. ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो.

 

First Published on: April 14, 2020 2:45 PM
Exit mobile version